---Advertisement---

अवघ्या सतराव्या वर्षी रोहतक ते सिडनी असा प्रवास करणारी ‘शानदार शेफाली’

On: शुक्रवार, मे 14, 2021 10:56 PM
---Advertisement---

क्रिकेट मैदानावर सतत आपली प्रतिभा दाखविणारी शेफाली वर्मा आता महिला बिग बॅश लीगमध्ये खेळण्यास सज्ज झाली आहे. ती दोन वेळा विजेता ठरलेल्या सिडनी सिक्सर्ससाठी स्पर्धेत खेळणार आहे. सिडनी सिक्सर्स फ्रेंचायझी स्पिनर राधा यादव हिच्याशी देखील चर्चा करत आहे. हरियाणाच्या रोहतक येथील रहिवासी असलेल्या शेफालीने लहान वयातच क्रिकेटमध्ये कारकीर्द बनविण्याचा निर्धार केला होता.

रोहतकमधील सोनार गल्लीत राहणार्या शेफालीने आपल्या खोलीत लेदरचा एक चेंडू लटकवला आहे आणि ती दररोज त्यावर सराव करत असते. पुढील महिन्यात द्विपक्षीय मालिकेसाठी ती संघासह इंग्लंडला जाईल. शेफाली तिच्या लहानपणापासूनच मोठ्या वयाच्या मुलांबरोबर खेळायची. कालांतराने तिने अश्वनी राय यांच्या क्रिकेट अकादमीमध्ये जाण्याचे ठरवले. गेल्या वर्षी टी२० विश्वचषकातही तिने शानदार प्रदर्शन केले. त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारख्या दिग्गज खेळाडूंनी तीचे कौतुक केले होते.

बिग बॅश खेळणारी तिसरी भारतीय महिला
शेफाली पूर्वी बिग बॅश लीगमध्ये भारतीय महिला टी२० संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ही सिडनी थंडर्स, सलामीवीर स्मृती मंधाना ब्रिस्बेन हिट व अष्टपैलू वेदा कृष्णमूर्ती होबार्ट हरिकेन्स संघासाठी खेळली आहे.

जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी आहे शेफाली
सध्या केवळ १७ वर्षाची असलेली शेफाली सध्या आंतरराष्ट्रीय महिला टी२० फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. मागील वर्षी झालेल्या महिला टी२० विश्वचषकात तिने चमकदार कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. शेफाली बिग बॅशपूर्वी जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ ही स्पर्धा खेळेल. यामध्ये ती बर्मिंघम फिनिक्स संघाचे प्रतिनिधित्व करेल. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर शेफालीने आत्तापर्यंत २२ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळताना १४८.३१ अशा धडाकेबाज स्ट्राईक रेटने ६१७ धावा कुटल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला संघाची झाली घोषणा

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारे न्यूझीलंडचे ३ गोलंदाज

तो पुन्हा आलाय! जोफ्रा आर्चरने केले धडाकेबाज पुनरागमन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---