कोलकाता नाईट रायडर्स संघातील फिरकीपटू वरुण चक्रवर्तीची कहानी एखाद्या चित्रपटासारखीच आहे. वरुणला लहाणपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. १७ वर्षांच्या वयात दुखापती आणि संधी न मिळाल्यामुळे तो आपल्या शाळेकडे वळला होता. त्याने एका सामान्य विद्यार्थ्याप्रमाणे आपले शालेय शिक्षण पूर्ण करून नोकरी केली. परंतु तिथेही मन न रमल्यामुळे तो पुन्हा क्रिकेटकडे वळला.
चेन्नईमध्ये आर्किटेक्टचे घेतले शिक्षण
वरुण चक्रवर्तीने केवळ १७ वर्षांच्या वयात २ वेळा दुखापतींमुळे क्रिकेट खेळणे सोडले होते. १२ वी पास केल्यानंतर त्याने ५ वर्षे चेन्नईमध्ये आर्किटेक्टचे शिक्षण घेतले. यानंतर त्याने नोकरीही केली. परंतु तिथे त्याचे मन लागले नाही. यानंतर त्याने वयाच्या २६ व्या वर्षी पुन्हा क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवले.
क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत वरुण म्हणाला, “क्रिकेट माझ्या आयुष्यात पुन्हा परतेल याचा मी विचार केला नव्हता. परंतु मी पुनरागमन करण्यात यशस्वी ठरलो.”
करोडो रुपयांमध्ये झाला संघात सामील
नोकरी सोडून वरुण पुन्हा मैदानावर परतला. त्याने तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये केवळ ९ सामने खेळत २२ विकेट्स घेतल्या. यानंतर त्याला २०१९ मध्ये आयपीएल फ्रँचायझी किंग्स इलेव्हन पंजाब संघाने ८ कोटी ४० लाख रुपयांची बोली लावत आपल्या संघात सामील केले होते. त्यानंतर २०२० आयपीएलसाठी झालेल्या लिलावात त्याला कोलकाता नाईट रायडर्सने ४ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले आहे.
उत्तम फिरकीपटू
क्रिकेटचे तज्ज्ञ वरुणला एक उत्तम फिरकीपटू म्हणतात. तो ऑफ ब्रेक, लेग ब्रेक, गुगली, कॅरम बॉल, फ्लिपर आणि टॉप स्पिन यांसारखे चेंडू टाकू शकतो. आतापर्यंत त्याने कोलकाता संघासाठी खेळताना ७ सामने खेळले असून ६ विकेट्स घेतल्या आहेत.
धोनीची घेतली विकेट
वरुण कोलकातासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध खेळताना त्याने चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीलाही त्रिफळाचीत केले होते. धोनीची विकेट घेतल्यानंतर त्याने म्हटले होते की, हा त्याच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण क्षण होता. सामन्यानंतर त्याने धोनीसोबत फोटोही घेतला होता. सोबतच धोनीने त्याला शाबासकीदेखील दिली होती.
वरुणने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ७ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-तीन वर्षांपूर्वी खास धोनीला खेळताना पाहण्यासाठी यायचा स्टेडियममध्ये; त्यानेच केली दांडी गुल
-दिनेश कार्तिकची ‘ही’ रणनीती धोनीच्या चेन्नईला पडली भलतीच महागात
-राजस्थानची विजयाची हॅट्रिक हुकली, कोलकाताचा राजस्थानवर ‘राॅयल’ विजय
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १४: भारताचा जंबो गोलंदाज ‘अनिल कुंबळे’