भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघातील 2 सामन्यांची कसोटी मालिका नुकतीच संपली. या मालिकेत भारताने 2-0 ने वर्चस्व गाजवले. तत्पूर्वी भारत-बांगलादेश संघात आता 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. या टी20 मालिकेला (6 ऑक्टोबर) पासून सुरूवात होईल. पहिला टी20 सामना ग्वाल्हेरमध्ये खेळला जाईल. पण याच वेळी बांगलादेशमध्ये शेख हसीना सरकार आणि हिंदू समुदायाच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या लोकांनी रविवारी म्हणजेच (6 ऑक्टोबर) रोजी भारत बंदची मागणी केली आहे. त्यामुळे ग्वाल्हेरमधील क्रिकेट मैदानाभोवती आणि मैदानाच्या आत 2,500 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार, ग्वाल्हेर झोनचे पोलिस महानिरीक्षक अरविंद सक्सेना म्हणाले की, “सामन्याच्या दिवशी लोक दुपारी 2 नंतर रस्त्यावर उतरतील. त्यानंतर प्रेक्षक त्यांच्या घरी जाईपर्यंत पोलिस कर्मचारी त्यांचे कर्तव्य बजावत राहतील. आदेशानुसार, सुरक्षा वाढवण्यात आली आहे आणि आम्ही सोशल मीडियावरही बारीक लक्ष ठेवून आहोत.”
भारत-बांगलादेश संघातील टी20 मालिकेतील पहिला सामना (6 ऑक्टोबर) रोजी ग्वाल्हेरमध्ये होणार आहे. दुसरा सामना (9 ऑक्टोबरला) दिल्लीत तर तिसरा सामना (12 ऑक्टोबर) रोजी हैदराबादमध्ये खेळला जाईल. आत्तापर्यंत बांगलादेशला टी20 क्रिकेटच्या इतिहासात भारताला फक्त एकदाच हरवता आले आहे. 2019 मध्ये दिल्लीत झालेल्या त्या सामन्यात मुशफिकर रहीमने 60 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून भारताला पराभूत करण्यात मोठे योगदान दिले होते.
बांगलादेशविरूद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा, मयंक यादव
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेचे ‘हे’ 4 धुरंधर आयपीएल मेगा लिलावापूर्वी होणार रिलीज?
श्रीलंकेच्या संगकाराने भारताच्या ‘या’ खेळाडूला म्हटले जगातील सर्वोत्तम टी20 फिनीशर!
कसोटीमधील रिषभ पंतचे हे 5 मोठे विक्रम मोडणे जवळपास अशक्य