---Advertisement---

स्टूअर्ट बिन्नी ठरलाय वीरुपेक्षा वरचढं! पहिल्याच सामन्यात मोडला ‘हा’ मोठा विक्रम

On: रविवार, सप्टेंबर 11, 2022 12:13 PM
---Advertisement---

रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज 2022 चा पहिला सामना शनिवारी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर इंडिया लिजेंड्स आणि दक्षिण आफ्रिका लीजेंड्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील इंडिया लिजेंड्सने 61 धावांनी दणदणीत विजय नोंदवत स्पर्धेला सुरुवात केली. भारताच्या विजयाचा नायक स्टुअर्ट बिन्नी होता, ज्याने धडाकेबाज खेळी करत संघाला 217 धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेला निर्धारित 20 षटकांत 9 गड्यांच्या मोबदल्यात 156 धावाच करता आल्या. यादरम्यान राहुल शर्माने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.

बिन्नीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 42 चेंडूत 5 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 82 धावांची नाबाद खेळी खेळली, ज्या दरम्यान त्याचा स्ट्राइकरेट 195.24 होता. या खेळीच्या जोरावर बिन्नी या स्पर्धेत भारतासाठी एका डावात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम वीरेंद्र सेहवागच्या नावावर होता, ज्याने गेल्या वर्षी 35 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या होत्या. या झंझावाती खेळीच्या जोरावर स्टुअर्ट बिन्नीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ASIA CUP: रिजवान खेचून घेणार कोहलीचा ‘नंबर 1’चा मुकूट! कराव्या लागतील फक्त ‘इतक्या’ धावा
‘आम्ही हा सामना जबरदस्तीने खेळलो!’ पहिल्या टी20त पराभवानंतर हरमनप्रीत कौरने केला खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---