---Advertisement---

द लिजेंड्स! ऍंडरसन-ब्रॉड जोडीने एकत्रित मिळवले 1000 कसोटी बळी, बनले इतिहासातील केवळ दुसरीच जोडी

On: शुक्रवार, फेब्रुवारी 17, 2023 4:01 PM
Stuart Broad and James Anderson
---Advertisement---

न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्या दरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना माऊंट मॉन्गुई येथे खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवशी पाहुण्या इंग्लंड संघाने आपले वर्चस्व गाजवले. त्याचवेळी इंग्लंडची सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजी जोडी जेम्स ऍंडरसन व स्टुअर्ट ब्रॉड यांनी या कसोटीत एक मोठा इतिहास रचला. एकत्रितरित्या कसोटी सामने खेळताना 1000 बळी मिळवणारी ही केवळ दुसरी जोडी बनली.

उभय संघातील या सामन्यात इंग्लंडने वेगवान फलंदाजी करताना आपला डाव पहिल्या दिवशी 9 बाद 325 वर घोषित केला होता. या सामन्यात उतरण्याआधी ऍंडरसन-ब्रॉड या जोडीकडे कसोटी क्रिकेटमध्ये एकत्रित खेळताना 1000 बळी टिपण्याची संधी होती. त्यांनी तोपर्यंत 132 कसोटीत 997 बळी मिळवले होते. पहिल्या दिवशीच फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडचे केन विलियम्सन व हेन्री निकोल्स यांना ऍंडरसन याने तंबूचा रस्ता दाखवत हा आकडा 999 पर्यंत नेला.

दुसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच नील वॅग्नर याला बाद करत 1000 एकत्रित बळींचा टप्पा पूर्ण केला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी अशी कामगिरी केवळ शेन वॉर्न व ग्लेन मॅकग्रा या जोडीने केली होती. त्यांच्या नावे 104 सामन्यात 1001 बळी जमा आहेत. आता या जोडीचे नावे देखील तितकेच बळी जमा झाले. न्यूझीलंडच्या दुसऱ्या डावात त्यांना त्यांच्या पुढे जाण्याची संधी असेल.

ऍंडरसन व ब्रॉड हे सध्या सक्रिय क्रिकेटपटूंपैकी जगातील सर्वात जास्त आंतरराष्ट्रीय कसोटी सामने खेळलेले खेळाडू आहेत. ऍंडरसनने आतापर्यंत 178 सामन्यात 677 बळी टिपले आहेत. तर, दुसऱ्या बाजूला ब्रॉडने 160 सामन्यात 567 बळी आपल्या नावे केले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकर याच्या नावे असून, सचिनने 200 कसोटी मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले.

(Stuart Broad And James Anderson Complete 1000 Test Wickets Combined)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-

पुजाराचा शंभराव्या कसोटीबद्दल गावसकरांकडून खास सन्मान, व्हिडिओत दिसला भारतीय क्रिकेटचा इतिहास
नाणेफेकीचा कौल जिंकत ऑस्ट्रेलिया करणार बॅटिंग, टीम इंडियात ‘या’ पठ्ठ्याचे पुनरागमन

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---