---Advertisement---

‘लॉर्ड्स’चा लॉर्ड बनला ब्रॉड! ‘ती’ आगळीवेगळी कामगिरी करणारा अँडरसननंतर केवळ दुसराच गोलंदाज

On: गुरूवार, ऑगस्ट 18, 2022 11:45 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यान क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर कसोटी मालिकेतील पहिली कसोटी खेळली जात आहे. सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांवर तरी पाहुण्या दक्षिण आफ्रिकेने वर्चस्वय गाजवले आहे. त्याचवेळी दुसऱ्या दिवशीच्या खेळात इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने एक बळी मिळवत इतिहासाच्या पानांमध्ये आपले नाव पुन्हा एकदा नोंद केले.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर होत असलेल्या या सामन्यात दुसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने चिवट फलंदाजी करत इंग्लंडवर मोठी आघाडी घेण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. मात्र, त्याचवेळी संघाचा दुसरा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज कायले वेराने याला बाद करत लॉर्ड्सवर १०० कसोटी बळी मिळवण्याची अनोखी कामगिरी केली. यापूर्वी त्याचाच साथीदार व अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने या मैदानावर ‌ही कामगिरी केली आहे.

 

जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यापूर्वी केवळ तीनच असे गोलंदाज होते ज्यांनी एकाच मैदानावर १०० बळी टिपले आहेत. अँडरसन व्यतिरिक्त श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनने कोलंबो, कॅंडी आणि गाले या तीन मैदानांवर तर श्रीलंकेच्या रंगाना हेराथने गाले येथे ही कामगिरी करून दाखवली होती.

या पहिल्य कसोटीविषयी बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेने यजमान संघाला चांगलेच दबावाखाली ठेवले आहे. कगिसो रबाडाच्या नेतृत्वातील दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात अवघ्या १६५ धावांवर सर्वबाद केले. रबाडाने पाच बळी आपल्या नावे केले. त्यानंतर प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने एर्विचे अर्धशतक व इतर फलंदाजांच्या उपयुक्त योगदानाच्या जोरावर, दुसऱ्या दिवशीच्या तिसऱ्या सत्रापर्यंत १२० पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेटचा ‘राजा बाबू’! एका पायावर मारले तब्बल ७० षटकार; आता सरकारकडून आहे अपेक्षा

‘संजू बाबा’चा विषये का! एकदा चेंडू हातून निसटूनही पूर्ण केला झेल, पाहा कौतुकास्पद कॅच

थेट हृदयावर वार! राष्ट्रगीतापूर्वी कर्णधार राहुलने असे काही करत ठेवला देशभक्तीचा आदर्श

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---