इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये नुकतीच ऍशेस मालिका पार पाडली. यावर्षीची ऍशेस मालिका 2-2 अशा बरोबरीवर सुटली. ऍशेस संपल्यानंतर दोन्ही संघांना आयसीसीकडून झटका मिळाला. षटकांची गती राखता आली नाही, म्हणून आयसीसीने दोन्ही संघांवर आर्थिक कारवाई केलीच, पण सोबतच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणालितेली गुण देखील कमी केले. याच पार्श्वभूनीवर इंग्लंडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने नाराजी व्यक्त केली.
ऍशेस 2023चा शेवटचा सामना केविंगटन ओव्हल स्टेडियमवर पार पडला. इंग्लंडने या सामन्यात शेवटच्या डावात जबरदस्त गोलंदाजी करत 49 धावांनी विजय मिळवला. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असून त्याने शेवटच्या डावात 2 महत्वपूर्ण विकेट्स घेतल्या. गोलंदाजांच्या अप्रतिम प्रदर्शनामुळे इंग्लंडने या मालिकेतील पराभव टाळला. पण मालिका संपल्यानंतर संघाच्या गुणांमध्येही चांगलीच कपात करण्यात आली. आयसीसीकडून षटकांची गती राखता न आल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे 10, तर इंग्लंडचे 19 डब्ल्यूटीसी गुण कापले गेले. आयसीसीच्या नियमानुसार निर्धारित वेळेनंतर टाकल्या जाणाऱ्या प्रत्येक षटकासाठी एक गुण कापला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त घेतल्यानंतरही ब्रॉड देखील आयसीसीच्या या नियमाबाबत नाराज दिसतो.
खेळाडू आणि आपल्या संघाला झालेले नुकसान लक्षात घेत स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला की, “खरं सांगायचं तर पेनल्टी पॉइंट्समुळे डब्ल्यूटीसीच्या प्रासंगिकता कमी होत आहे. ही (ऍशेस) आतापर्यंतची सर्वात रोमांचक मालिकांपैकी एक होती. इंग्लंडला अपेक्षित 60 पैकी फक्त 9 गुण मिळाले आहेत. यावरून कुठेतली आयसीसीची कार्यप्रणाली चूकत असल्याचे दिसते. यावर लक्ष दिले पाहिजे.”
दरम्यान, आयसीसीच्या नियमानुसार डब्ल्यूटीसीमध्ये एक कसोटी सामना जिंकल्यानंतर त्या संघाला 12 गुण दिले जातात. मॅच ड्रॉ झाल्यानंतर चार गुण दिले जातात, तर पराभूत झालेल्या संघाला एकही गुण मिळत नाही. ऍशेस 2023 ही इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघासाठी डब्ल्यूटीसी 2023-25 हंगामातील पहिलीच मालिका होती, जी बरोबरीत सुटली. मालिकेतील दोन सामने जिंकून देखील इंग्लंड 9, तर ऑस्ट्रेलियाला 18 गुण मिळाले. डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया संध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आहे. यादीत पहिल्या क्रमांकावर पाकिस्तान आहे, तर भारतीय संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Stuart Broad expressed displeasure over ICC’s slow over rate rule)
महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे उपकर्णधार म्हणजे खरा काटेरी मुकुट! असे का म्हणतात? नक्की वाचा
भारतासाठी ‘करो या मरो’ स्थिती, पराभव स्वीकारला तर मोडीत निघणार 17 वर्षांपासूनची कामगिरी