---Advertisement---

भारतासाठी ‘करो या मरो’ स्थिती, पराभव स्वीकारला तर मोडीत निघणार 17 वर्षांपासूनची कामगिरी

hardik Pandya Suryakumar Yadav
---Advertisement---

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका सध्या खेळली जात आहे. मंगळवारी (8 ऑगस्ट) उभय संघांतील तिसरा टी-20 सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना निर्णायक असणार आहे, कारण पहिल्या दोन्ही सामन्यात पाहुण्या संघाला पराभव मिळाला आहे. तिसऱ्या सामन्यातील पराभानंतर भारताला मालिका गमवावी लागेलच, पण सोबतच एक नकोशी कामगिरी देखील संघ करेल. अशात तिसऱ्या सामन्यातील विजय भारतासाठी महत्वाचा बनला आहे.

टी-20 मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडीजने 4 धावांनी जिंकला होता, तर दुसऱ्या सामन्यात 2 विकेट्सने विजय मिळवला. आज यजमान वेस्ट इंडीजकडे विजयाची हॅट्रीक करत मालिका नावावर करण्याची संधी आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मागच्या 17 वर्षांमध्ये भारताला किमान तीन सामन्यांच्या मालिकेत एकदाही वेस्ट इंडीजकडून पराभव स्वीकारला नाहीये. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत शेवटचा पराभव भारताने 2006 साली स्वीकारला होता. पण मंगळवारी (8 ऑगस्ट) भारतीय संघ पराभूत झाला, तर हा विजयरथ थांबला जाईल. 17 वर्षांनंतर वेस्ट इंडीजकडे भारताविरुद्धच्या मालिकेत विजय मिळवण्याची संधी तयार झाली आहे.

दरम्यान, भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात संघात काही बदल करण्याची शक्यता नाकारता येत नाही. ईशान किशन आणि शुबमन गिल ही सलामीवीरांची जोडी पहिल्या दोन्ही सामन्यात अपयशी ठरला होती. अशात यशस्वी जयसवालला संधी दिली जाऊ शकते. त्याव्यतिरिक्त अक्षर पटेल याच्या जागीही एखाद्या वेगवान गोलंदाजाला संधी मिळू शकते. कारण पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये अक्षर पटेलला गोलंदाजीच्या अपेक्षित संधी मिळाल्या नाही. दुसऱ्या सामन्यात हार्दिकने त्याला एकही षटक टाकू दिले नाही. (The third T20 match against West Indies will be important for India)

महत्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचे उपकर्णधार म्हणजे खरा काटेरी मुकुट! असे का म्हणतात? नक्की वाचा
लंका प्रीमियर लीगमध्येही बाबरचे शतक! गेलनंतर ‘ही’ कामगिरी करणारा दुसराच फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---