---Advertisement---

सिडनी कसोटीतील चमकदार कामगिरीनंतर ब्रॉडने बोलून दाखवली मनातील खदखद; म्हणाला…

On: सोमवार, जानेवारी 10, 2022 7:35 AM
stuart-broad
---Advertisement---

सध्या खेळल्या जात असेलल्या ऍशेस मालिकेतील (ashes series) चौथा कसोटी सामना सिडनीमध्ये पार पाडला. हा सामना इंग्लंडने अनिर्णीत राखला. इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (stuart broad) याने या सामन्यात संघात पुनरागमन केले आणि एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. तत्पूर्वी, ऍशेसच्या तिसऱ्या सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले नव्हते. अशात चौथ्या सामन्यातील प्रदर्शनानंतर त्याने स्वतःला सिद्ध केले आहे. चौथ्या सामन्यातील प्रदर्शनाविषयी ब्रॉडने स्वतः एक खास प्रतिक्रिया दिली आहे.

ओली रॉबिन्सनला दुखापत झाल्यामुले चौथ्या कसोटीत ब्रॉडने संघात पुनरागमन केले. सामन्याच्या पहिल्या डावात त्याने अप्रतिम गोलंदाजीचे प्रदर्शन करून दाखवले. पहिल्या डावात त्याने २९ षटके टाकली आणि यामध्ये १०१ धावा देऊन तब्बल पाच विकेट्स घेतल्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि उस्मान ख्वाजा या दिग्गज फलंदाजांच्या विकेटचा समावेश होता. त्याच्या कसोटी कारकिर्दीत ही १९ वी वेळ आहे, जेव्हा ब्रॉडने एका डावात पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ब्रॉड म्हटला की, दिग्गज फलंदाजांची विकेट घेतल्यमुळे त्याचा आत्मविश्वास वाढल आहे. “या मालिकेतील मागच्या सामन्यातून बाहेर होण्याच्या निराशेनंतर मी स्वतःला सिद्ध करू शकलो. मी अजूनही जागतिक दर्जाच्या खेळाडूंना बाद करू शकतो, हे खूप महत्वाचे आहे. एमसीजीमध्ये पहिल्या डावात डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ आणि उस्मान ख्वाजा सारख्या उत्कृष्ट फलंदाजांना बाद करून मला आनंद झाला. मला या गोष्टीचा आनंद आहे की, सुरुवातीला मला न खेळवल्यानंतर मी स्वतःला शारीरिक आणि मानसिक रूपात फिट ठेवले.”

“जेव्हा मला ब्रिस्बेन आणि मेलबर्नमध्ये खेळवले गेले नाही, तेव्हा मी त्याच पद्धतीने प्रक्रिया सुरू ठेवली. तुम्हाला स्वतःला झोकून दिले पाहिजे. तसेच, संधी मिळाल्यानंतर सिद्ध करावे लागते.” असे ब्रॉडने पुढे म्हटले.

दरम्यान, इंग्लंड संघाचे ऍशेल मालिकेतील आतापर्यंतचे प्रदर्शन निराशाजनक राहिले आहे. इंग्लंडने पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये पराभव पत्करला, तर एक सामना अनिर्णीत केला. इंग्लंडच्या या अपयशामागे अनेक दिग्गजांनी प्लेइंग इलेव्हनची निवड चुकीची असल्याचे कारण सांगितले आहे. दिग्गजांच्या मते मेलबर्न आणि ब्रिस्बेन कसोटी सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला संधी मिळाली असती, तर इंग्लंड संघ अधिक चांगले प्रदर्शन करू शकला असता.

महत्वाच्या बातम्या –

अव्वल स्थानावरील पकड मजबूत करण्याचे मुंबई सिटी एफसीचे लक्ष्य!

रोहित आणि मुंबई इंडियन्सचे नाते झाले ११ वर्षांचे; फ्रॅंचाईजीने शेअर केली ‘खास’ पोस्ट

PHOTOS: टेन्शन म्हणजे काय असते? स्टोक्सला विचारा? पाहा व्हायरल फोटो

व्हिडिओ पाहा –

जोहान्सबर्ग कसोटी तर गमवलीच, पण भारतीय खेळाडूंनी वाद घालत सामन्याला लावल गालबोट | INDvsSA Clashes

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---