---Advertisement---

स्टुअर्ट ब्रॉड की हार्दिक पंड्या; कोणाचा हेडबँड लूक हटके? दिग्गज खेळाडूने दिले ‘हे’ उत्तर

---Advertisement---

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये पहिला वनडे सामना पार पडला. या सामन्यातून भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने पुनरागमन केले आहे. या सामन्यादरम्यान हार्दिकची त्याच्या कामगिरीपेक्षाही अधिक चर्चा नव्या लूकची झाली. हार्दिक पंड्याचा नवीन लूक चाहत्यांच्या पसंतीचा ठरत आहे. इतकेच नव्हे तर दिग्गज इंग्लिश गोलंदाजही त्याचे कौतुक करण्यापासून स्वतः ला आवरू शकला नाही.

इएसपीएन क्रीकइन्फोने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये हार्दिक पंड्या आणि दिग्गज इंग्लिश खेळाडू स्टुअर्ट ब्रॉड यांच्या फोटोचा कोलाज करण्यात आला आहे. दोन्ही खेळाडूंनी या फोटोमध्ये हेडबँड घातले आहे.हा फोटो शेअर करत त्यांनी प्रश्न देखील विचारला आहे की, दोघांपैकी कोणाचा हेडबँड घातलेला लूक चांगला दिसत आहे. यावर दिग्गज खेळाडू स्टुअर्ट ब्रॉडने हार्दिक पंड्याला टॅग करत ‘लव्ह इट’ असे लिहिले आहे.

तसेच या फोटोवर अनेक चाहत्यांनी ही आपल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका चाहत्याने लिहिले की,”एका महान खेळाडूने दुसऱ्या महान खेळाडूचे कौतुक केले. तसेच आणखी एका युजरने माजी भारतीय गोलंदाज अशोक दिंडाचा हेडबँड घातलेला फोटो शेअर केला आहे.

हार्दिक पंड्या नेहमीच आपल्या हटके लूकसाठी ओळखला जातो. त्याचा नवा लूक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. (Stuart broad loves hardik Pandya headband look)

https://twitter.com/RegeParag/status/1416737999342096386

हार्दिक पंड्याने केली गोलंदाजी 

गेल्या काही महिन्यांपासून हार्दिक पंड्या दुखापतीमुळे फार जास्त गोलंदाजी करू शकत नव्हता. परंतु, भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात तो गोलंदाजी करताना दिसून आला आहे. हार्दिकने या सामन्यात ३३ धावा देत इसरू उडानाला माघारी धाडले. तसेच हार्दिकचा भाऊ कृणाल पंड्याने १० षटक गोलंदाजी करत अवघ्या २६ धावा खर्च केल्या आणि १ गडी देखील बाद केला.

या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर ९ बाद २६२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय कर्णधार शिखर धवनने नाबाद ८६ धावांची खेळी केली आणि इशान किशनने ५९ धावांची खेळी केली. हा सामना भारतीय संचांड ३६.४ षटकात ७ गडी शिल्लक असताना आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

शॉ-इशानच्या विस्फोटानंतर ‘या’ दोन अनुभवी खेळाडूंची वाढली धडधड, टी२० विश्वचषकातील स्थान घेऊ शकते धोक्यात

वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा भोगले होणे नाही…

दुर्दैव! पदार्पणाची संधी असतानाही कोलंबो वनडेला मुकला सॅमसन, आता संपूर्ण दौऱ्यातूनही बाहेर?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---