काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा माजी दिग्गज ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाच मुख्य प्रशिक्षक बनला. खराब फॉर्ममधील इंग्लंड संघाला पुन्हा त्यांच्या चांगल्या फॉर्ममध्ये आणण्याची जबाबदारी मॅक्युलमच्या खांद्यावर सोपवली गेली आहे. मॅक्युलम जेव्हा संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला, तेव्हा स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन हे दिग्गज संघातून बाहे होते, पण आता त्यांनी पुनरागमन केले आहे. या दोघांच्या पुनरागमनानंतर एक मजेशीर आकडेवारी चाहत्यांच्या समोर आली आहे.
तसे पाहिले, तर प्रशिक्षक नेहमीच खेळाडूंच्या प्रदर्शनात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्या चुका दाखवून देण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडत असतो. मात्र, सध्याच्या इंग्लंड संघात प्रशिक्षक खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी सक्षम असल्याचे दिसत नसल्याच्या चर्चा आहेत. कारण, वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) मॅक्युलमला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत सर्वाधिक वेळा बाद करणारा गोलंदाज आहे आणि आज मॅक्युलम (Brendon McCullam) त्यालाचा प्रशिक्षण देत आहे.
ब्रेंडन मॅक्युलमच्या कारकिर्दीचा विचार केला, तर स्टुअर्ट ब्रॉडने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १० वेळा बाद केले आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर मुथय्या मुरलीधरन आहे, ज्याने मॅक्युलमला त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत ९ वेळा बाद केले. तिसऱ्या क्रमांकावरील जेम्स अँडरसनने मॅक्युलमनला तब्बल ८ वेळा बाद केले आहे आणि आज अँडरसन देखील मॅक्युलमच्याच प्रशिक्षणाखाली खेळत आहे. जहीर खान आणि रंगना हेरथने देखील मॅक्युलमला प्रत्येकी आठ-आठ वेळा बाद केले होते.
ब्रेंडन मॅक्युलमला सर्वाधिक वेळा बाद करणारे गोलंदाज
१० वेळा – स्टुअर्ट ब्रॉड
९ वेळा – मुथय्या मुरलीधरन
८ वेळा – जेम्स अँडरसन
८ वेळा – जहीर खान
८ वेळा – रंगना हेरथ
जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ड ब्रॉड यांना काही दिवसांपूर्वी जास्त वयाच्या कारणास्तव इंग्लंडच्या कसोटी संघातून वगळले गेले होते. मात्र, इंग्लंड संघाचे सततचे खराब प्रदर्शन पाहून संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक देखील बदलला गेला आहे. आता मॅक्युलम संघाचा प्रशिक्षक असून कर्णधारपदाची जबाबदारी बेन स्टोक्सने स्वीकारली आहे. मॅक्युलमने अँडरसन आणि ब्रॉड यांना त्यांचा उत्कृष्ट फॉर्म लक्षात घेऊन संघात सहभागी केले. आगामी काळात इंग्लंड संघात अजूनही काही महत्वाचे बदल होण्याची शक्यता आले.
दरम्यान, गुरुवारी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना ऐतिहासिक लॉर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे. पहिल्या डावात अँडरसन आणि मॅथ्यू पॉट यांनी न्यूझीलंडच्या प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या आणि त्यांना अवघ्या १३२ धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने देखील ११६ धावांवर त्यांच्या ७ विकेट्स गमावल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अफलातून! बेयरस्टोने घेतला न्यूझीलंडच्या ओपनरचा अविश्वसनीय झेल, पाहून तुम्हीही कराल पठ्ठ्याचं कौतुक
‘बाप-लेकीची जोडी जगात भारी’, अजिंक्य रहाणेने शेअर केला मुलीसोबतचा सुपर क्यूट व्हिडिओ
मिल्सने हवेत झेप घेत चित्त्याच्या चपळाईने घेतला अवघड कॅच, मुंबईनेही व्हिडिओ शेअर करत केलं कौतुक