भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिले २ सामने चेन्नई येथे पार पडले. दरम्यान दुसऱ्या कसोटीसाठी वापरलेल्या खेळपट्टीबद्दल बरिच चर्चा झाली. अनेक इंग्लंडच्या दिग्गजांनी खेळपट्टीवर टीकाही केली. मात्र आता इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनी खेळपट्टीवर टीका करणाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला २२७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यांनतर दुसरा कसोटी सामाना देखील चेन्नईमध्येच खेळवण्यात आला होता. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंड संघाला ३१७ धावांनी पराभूत केले होते. या खेळपट्टीवर काळया मातीचा वापर करण्यात आला होता. याचा फायदा भारतीय संघाच्या फिरकी गोलंदाजांना झाला होता. भारतीय संघाकडून गोलंदाजी करतांना अश्विन आणि अक्षरच्या जोडीने १५ गडी बाद केले होते. मात्र, या सामन्यातील खेळपट्टीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.
पण आता इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने या चर्चेला पुर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. स्टुअर्ट ब्रॉड याने डेली मेलसाठी एका स्तंभामध्ये लिहिले की, “आम्ही दुसऱ्या कसोटी सामन्याच्या खेळपट्टीवर टीका करणार नाही. घरच्या मैदानात खेळत असताना यजमान संघाला फायदा होतोच आणि हा तुमचा हक्क आहे, जो तुम्ही घ्यायलाच हवा. भारतीय संघाने आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळले. त्यांच्याकडे खूप क्षमता असलेले खेळाडू आहेत. ती खेळपट्टी आमच्यासाठी एकदम वेगळी होती.”
तसेच तो पुढे म्हणाला, “आम्ही सामन्यात चांगले प्रदर्शन केले नाही. चेन्नईच्या खेळपट्टीवर आम्ही आमच्या क्षमतेनुसार खेळलो नाही.भारतीय संघाने चांगला खेळ खेळला.”
दिवस-रात्र होणार तिसरा सामना –
जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियम असलेल्या मोटेरा स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड संघात तिसरा कसोटी सामना होणार आहे. हा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. इंग्लंडचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. तर भारताचा तिसरा कसोटी सामना असेल.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा संघ
जो रूट (कर्णधार) जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, जॉनी बेयरस्टो, डोमिनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जॅक क्रॉली, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ओली पोप, डोम सिब्ली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, क्रिस वोक्स, मार्क वुड.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियात निवड होताच सुर्यकुमारची तुफानी खेळी; मुंबईला मिळवून दिला विजय
संगकाराला डायरेक्टर करताच राजस्थान रॉयल्सने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाची धमाकेदार फलंदाजी! ‘या’ स्पर्धेत ७ षटकारांसह केली शतकी खेळी