इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान झालेल्या मँचेस्टर कसोटीत पाकिस्तानच्या यासिर शाहविरुद्ध इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने वाईट भाषेचा वापर केला होता. त्यामुळे त्या सामन्याचे सामनाधिकारी आणि स्टुअर्ट ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड यांनी त्याच्यावर कारवाई केली. त्याबद्दल आता स्टुअर्ट ब्रॉडने त्याच्या वडीलांबद्दल मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
इंग्लंड क्रिकेट संघाचा चाहता समूह बार्मी आर्मीने ट्विटरवर स्टुअर्ट ब्रॉडवर झालेल्या कारवाईबद्दल लिहिले की, “स्टुअर्ट ब्रॉडला त्याचे वडील आणि सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी दंड ठोठावला आणि डिमरेट गुण दिले. आम्हाला वाटते की आता गाण्याचे काही शब्द बदलावे लागतील.”
बार्मी आर्मीच्या या ट्विटवर मजेशीर कमेंट करताना ब्रॉडने लिहीले की ‘आता ते (ख्रिस ब्रॉड) ख्रिसमस कार्ड आणि भेटवस्तू देणार्या लोकांच्या यादीतून बाहेर आहेत.’
He’s off the Christmas card & present list
— Stuart Broad (@StuartBroad8) August 11, 2020
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील अयोग्य भाषा, कृती किंवा हावभाव संदर्भात स्टुअर्ट ब्रॉड आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.५ चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे. त्यामुळे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी त्याच्यावर सामन्याच्या १५ टक्के दंड लावला आहे. तसेच त्याला १ डिमेरीट पाँइंट दिला आहे.
२४ महिन्यांतील हा त्याचा तिसरा गुन्हा आहे आणि त्याचे एकूण डिमेरिट पॉईंट्स हे तीन झाले आहेत. तत्पूर्वी, ब्रॉडने २७ जानेवारी २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या कसोटीत (वंडरर्स) आणि १९ ऑगस्ट २०१८ रोजी भारत (ट्रेंट ब्रिज) विरुद्ध तिसऱ्या कसोटीत नियमांचे उल्लंघन केले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
कित्येक भारतीय क्रिकेटर्सची कारकिर्द घडवणारा मुंबईकर काळाच्या पडद्याआड
पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटर सापडली नाडाच्या जाळ्यात, होऊ शकते ४ वर्षांसाठी बंदी
ट्रेंडिंग लेख –
भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार
कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज
ट्वेंटी२० क्रिकेटमध्ये १२ चेंडूत अर्धशतक झळकावणारे ३ महारथी