ऍशेस 2023चा शेवटचा सामना केविंगटन ओव्हलवर सुरू आहे. ओव्हल कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंड 377 धावांनी आघाडीवर आहे आणि स्टुअर्ट ब्रॉड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ब्रॉड आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना ओव्हलवर खेलत असून निवृत्तीची घोषणा करताना त्याने भारतीय दिग्गज युवराज सिंग याचाही उल्लेख केला.
युवराज सिंग (Yuvraj Singh) याने 2007 साली आयसीसी टी-20 विश्वचषकात स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याची चांगलीच धुलाई केली होती. युवराजने ब्रॉडच्या षटकातील सहा पैकी सहा चेंडूंवर षटकार मारला होता आणि हातातून निसटलेल्या सामन्यांमध्ये भारताला विजय मिळवून दिला होता. असे असले तरी, वयाच्या 21व्या वर्षी युवाराजकडून धुलाई झाल्यानंतर ब्रॉडने आपल्या कारकिर्दीत पुढे 17 वर्ष इंग्लंड संघाला सेवा पुरवली. ब्रॉज आज जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 600पेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. ब्रॉडने निवृत्तीवेळी सांगितल्याप्रमाणे त्याला मिळालेल्या यशामागे युवराज सिंग याचा हात आहे, असे म्हणता येईल. कारण युवारजने मारलेल्या सहा षटकारांमुळे त्याच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या.
पाचव्या ऍशेस कसोटीच्या तिसऱ्या दिवसाखेर ब्रॉडने निवृत्तीची घोषणा केली. यावेळी युवराजने मारलेल्या सहा षटकारांबाबतही त्याला प्रश्न विचारला गेला. ब्रॉड म्हणाला की, “हो क्षण माझ्यासाठी खूप कठीण होता. मी शक्यतो 21-22 वर्षांचा होतो. मी त्याच्याकडून खूपकाही शिकलो होतो. माझे सर्व मानसिक संतुलन त्यावर अवलंबून होते. मी गोलंदाजी करण्याआधी काहीच करत नव्हतो आणि माझे लक्ष कमी पडत होते. त्या अनुभवानंतर (युवराजने मारलेले सहा षटकार) माझ्या लढवय्या स्वभावाला सुरुवात झाली. त्या सामन्यामुळे आम्ही विश्वचषकातून बाहेर झालो नाही, पण त्या दिवसामुळे आजचा मी घडलो.”
दरम्यान, ब्रॉडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा विचार केला, तर तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून त्याने 845 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर आतावर्यंत 602 विकेट्स असून ओव्हल कसोटीच्या शेवटच्या डावात हा आकडा अजून वाढू शकतो. जेम्स अँडरसन आणि ब्रॉड यांनी सोबत मिळून कोसीट क्रिकेटमध्ये 1037 विकेट्स घेतल्या आहेत. ही कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांची जोडी देखील आहे. पण ओव्हल कसोटीनंतर या दोघांना पुन्हा कसोटी क्रिकेट एकत्र खेळता येणार नाही. 37 वर्षी बॉड आपला शेवटचा वनडे सामना 2016 मध्ये, तर शेवटचा टी-20 सामना 2014 मध्ये खेळला होता. कसोटी क्रिकेटमध्ये मात्र संघ व्यवस्थापनाकडून त्याला नेहमीच संधी दिली गेली आणि ब्रॉड देखील या विश्वासास पात्र ठरत आला. (Stuart Broad reacts to Yuvraj Singh’s six sixes as he retires from international cricket)
महत्वाच्या बातम्या –
‘हा’ संघ बनला Zim Afro T10चा पहिला-वहिला चॅम्पियन, 56 चेंडूत युसूफ पठाणच्या संघाचा खेळ खल्लास
‘याचं मुख्य कारण…’, रोहित आणि विराटला विश्रांती देण्यामागील कारणाचा कोच द्रविडकडून खुलासा