---Advertisement---

इंग्लंडला जबर धक्का! स्टुअर्ट ब्रॉड भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर, कारण घ्या जाणून

On: गुरूवार, ऑगस्ट 12, 2021 2:11 AM
---Advertisement---

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारपासून (१२ ऑगस्ट) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सुरू होईल. पहिला सामना अनिर्णित राहिल्यानंतर उभय संघ या सामन्यात विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करतील. तत्पूर्वी, या सामन्याआधी यजमान इंग्लंड संघासाठी एक वाईट खबर समोर आली आहे. इंग्लंडचा प्रमुख वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड हा उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे.

या कारणाने ब्रॉड मालिकेबाहेर
दुसऱ्या कसोटी सामन्याआधी मंगळवारी(१० ऑगस्ट) झालेल्या पहिल्या सराव सत्रात ब्रॉड दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे तो दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडणार अशी चर्चा सुरू झालेली. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) आता याबाबत अधिकृत वृत्त दिले. स्टुअर्ट ब्रॉड हा उजव्या मांसपेशी फाटल्याने मालिकेतील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. बुधवारी (११ ऑगस्ट) केलेल्या एमआरआय स्कॅनमध्ये ही दुखापत गंभीर असल्याची बाब समोर आली.

हा खेळाडू घेणार जागा
ब्रॉड मालिकेतून बाहेर पडल्यामुळे त्याच्या जागी बदली गोलंदाज म्हणून साकीब मेहमूदला संघात स्थान दिले गेले आहे. जुलै महिन्यात पाकिस्तान विरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस म्हणून त्याला ही संधी दिली गेली. त्याने आत्तापर्यंत इंग्लंडसाठी ९ वनडे व ७ टी२० सामने खेळले असून, त्यामध्ये अनुक्रमे ९ आणि १४ बळी मिळवले आहेत.

दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला भेडसावणार समस्या
स्टुअर्ट ब्रॉड मालिकेतून बाहेर पडला असून, अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हादेखील दुखापतग्रस्त असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या आक्रमणाची जबाबदारी संपूर्णपणे अनुनभवी गोलंदाजांच्या खांद्यावर असेल. ओली रॉबिन्सन, सॅम करन या दोघांसह मार्क वूड पुनरागमन करेल.

लॉर्ड्स कसोटीसाठी इंग्लंडचा संघ-
रॉरी बर्न्स, डॉम सिब्ली, डॅन लॉरेन्स, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), ओली रॉबिन्सन, मोईन अली, स्टुअर्ट ब्रॉड, सॅम करन, साकीब मेहमूद, जेम्स अँडरसन, झॅक क्राऊली, हसीब हमीद, मार्क वूड व जॅक लिच.

महत्त्वाच्या बातम्या – 

कधी, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना? जाणून घ्या एका क्लिकवर

नीरज चोप्राच्या सन्मानार्थ मोठी घोषणा; ‘या’ दिवशी दरवर्षी साजरा होणार ‘भालाफेक दिवस’

आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामापूर्वी शुभमन गिलने बदलला आपला पूर्ण लूक, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---