इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला ७ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह इंग्लंडने कसोटी मालिकाही २-२ अशा बरोबरीत सोडवली. उभय संघातील हा सामना बर्मिंघमच्या एजबस्टन स्टेडियमवर खेळला गेला. इंग्लडचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने या सामन्यात तीन विकेट्स घेतल्या, पण दुसऱ्या कारणास्तव त्याची चर्चा अधिक होत आहे. सामन्यादरम्यान मैदानातील पंचांनी ब्रॉडला चेतावणी दिली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
इंग्लंडच्या पहिल्या डावात हा प्रसंग घडला. स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) फलंदाजीसाठी आल्यावर एक वेळ अशी आली, जेव्हा मैदानी पंच रिचर्ड केटलबर्गचा राग त्याला पाहावा लागला. केटलबर्ग ब्रॉडवर रागवाल्यानंतर हा आवाज स्टंप माईकमध्ये कैद झाला. व्हिडिओत पाहिले जाऊ शकते की, पंच ब्रॉडला म्हणत आहेत की, “तू तोंड बंद कर आणि तुझी फलंदाजी कर”. केटलबर्गच्या बोलण्याच्या पद्धतीवरून समजते की, ते खूपच रागावले होते.
स्टंप माईकमध्ये स्पष्ट ऐकू येत आहे की, “तुझी फलंदाजी कर आणि तोंड बंद कर. आम्हाला आमचे पंचाचे काम करू दे आणि तू तुझी फलंदाजी कर, नाहीतर तू पुन्हा एकदा अडचणीत येशील.” पंचांच्या या चेतावणीनंतर देखील ब्रॉड शांत झाला नाही. त्यानंतर केटलबर्ग मोठ्याने म्हणाले की, “ब्रॉड…ब्रॉड…, जा तुझी फलंदाजी कर आणि तोंड बंद ठेव.”
दरम्यान, ब्रॉडचे या सामन्यातील प्रदर्शन पाहिले, तर त्याने पहिल्या डावात तब्बल ८९ धावा खर्च करून एक विकेट घेतली होती आणि फलंदाजी करताना अवघी १ धाव करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या डावात ब्रॉडने ५८ धावा खर्च करून २ विकेट्स घेतल्या आणि फलंदाजी करण्याची वेळ त्याच्यावर आलीच नाही.
https://twitter.com/SirFredBoycott/status/1544040715751411713?s=20&t=nihaaLrD7Pui3CAZjuFrZw
I can’t stop laughing 😭😭😭😂😂 https://t.co/clN1mGNcjM
— Mazher Arshad (@MazherArshad) July 5, 2022
सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतासाठी पहिल्या डावात रिषभ पंत आणि रवींद्र जडेजाने शतक ठोकले आणि संघाची धावसंख्या ४१६ पर्यंत पोहोचवली. इंग्लंड मात्र पहिल्या डावात २८४ धावांवर गुंडाळला गेला. दुसऱ्या डावात भारतीय संघही अवघ्या २४५ धावा करू शकला. शेवटच्या डावात इंग्लंडला विजयासाठी ३७८ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी ७ विकेट्स राखून गाठले. जॉनी बेयरस्टोने पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही डावांमध्ये शतक ठोकले. तसेच जो रुटही दुसऱ्या डावात शतकी योगदान देऊ शकला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाचव्या कसोटीनंतर पहिल्या टी२० सामन्यालाही मुकणार रोहित शर्मा? समोर आली मोठी अपडेट
पंत-जडेजाच्या शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडने ७ विकेट्सने जिंकली पाचवी कसोटी; मालिकाही बरोबरीत
पंत-जडेजाच्या शतकी खेळी व्यर्थ, इंग्लंडने ७ विकेट्सने जिंकली पाचवी कसोटी; मालिकाही बरोबरीत