---Advertisement---

ज्या वयात क्रिकेटर्स घेतात निवृत्ती, त्या वयात ब्रॉडचा अद्भुत कॅच; सुपरमॅनसारखा झेपावला हवेत

Stuart-Broad-Catch
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून उभय संघात ३ सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना पार पडला असून दक्षिण आफ्रिकेने एक डाव आणि ५६ धावांच्या फरकाने हा सामना खिशात घातला आहे. या सामन्यादरम्यान इंग्लंडचा ३६ वर्षीय क्रिकेटपटू स्टुअर्ट ब्रॉड याने डोळ्यांचे पारणे फेडणारा झेल घेत वय हा केवळ एक आकडा असल्याचे सिद्ध केले आहे.  

दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड (South Africa vs England) संघातील पहिल्या कसोटी सामन्याच्या (First Test) तिसऱ्या दिवशी हा प्रसंग घडला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ७८ व्या षटकात ब्रॉडने कागिसो रबाडाचा अविश्वसनीय झेल घेतला आहे.

दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ७८ वे षटक मॅटी पॉट्स टाकत होता. पॉट्सच्या या षटकातील तिसऱ्या चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या रबाडाने चौकार किंवा षटकार खेचण्यासाठी मोठा फटका मारला. रबाडाने मारलेला हा चेंडू बॅटलाही व्यवस्थित लागल्याने चेंडू सीमारेषेपार जाण्याची दाट शक्यता होती. परंतु ब्रॉडने (Stuart Broad) कमालीचे क्षेत्ररक्षण करत चेंडू पकडला. मिड ऑनवर क्षेत्ररक्षणासाठी उभा असलेल्या ब्रॉडने हवेत उडी मारली आणि एका हाताने अद्भुत झेल (Stuart Broad Catch) पकडला.

वयाची पस्तीशी पार केल्यानंतरही ब्रॉडने अगदी तरुण असल्याप्रमाणे हवेत डाईव्ह मारत हा झेल घेतला आहे. त्याने घेतलेला हा झेल पाहून कर्णधार बेन स्टोक्सही अचंबित झाला. तो वेगाने धावत येत ब्रॉडच्या गळ्याला पडला आणि झेलचा आनंद साजरा केला. इंग्लंड क्रिकेटने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर हा झेलचा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://twitter.com/englandcricket/status/1560568541450887168?s=20&t=rm9UIq_35gzC1lEbG3TrJA

दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाला विशेष प्रदर्शन करता आले नव्हते. इंग्लंडकडून ओली पोपने सर्वाधिक ७३ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ १६५ धावांवरच गारद झाला होता. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ३२६ धावांपर्यंत मजल मारली आणि पहिल्या डावाात १६१ धावांची आघाडी घेतली. या डावात दक्षिण आफ्रिकेकडून सलामीवीर सरेल इरवीने सर्वाधिक ७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १४९ धावांवरच सर्वबाद झाला आणि दक्षिण आफ्रिकेने सामना जिंकला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

संगत का असर! पुजाराच्या साथीदाराचे द्विशतक, ११ षटकार आणि १८ चौकारांसह केली मॅरेथॉन खेळी

क्रिकेट इतिहासातील इंग्लंड-पाकिस्तानचा ‘तो’ सामना, ज्याचा तीनदा लागला निकाल; इंझमामवर ४ वनडेचीही लागली बंदी

इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या ‘लेडी ब्रिगेड’ची घोषणा; संघात अनेक चकित करणारी नावे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---