Stuart Broad Set To Become Father Again :- इंग्लंडचा माजी क्रिकेटर स्टुअर्ट ब्रॉड यांच्या घरी लवकरच एक छोटा पाहुणा येणार आहे. ब्रॉड दुसऱ्यांदा वडील होणार आहे. खुद्द त्याच्या गर्लफ्रेंडने ही आनंदाची बातमी दिली आहे. इंग्लंडच्या माजी वेगवान गोलंदाज ब्रॉडची गर्लफ्रेंड मॉली किंगने सोशल मीडियावर बेबी बंपचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
स्टुअर्ट ब्रॉडने गेल्या वर्षी जुलैमध्येच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 2007 च्या टी20 विश्वचषकात भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंगने ब्रॉडच्या एका षटकात सलग सहा षटकार ठोकले होते. यासाठी आजही भारतीय क्रिकेटप्रेमींच्या तोंडात स्टुअर्ट ब्रॉडचे नाव असते.
चित्रपटाच्या कथेसारखी आहे स्टुअर्ट ब्रॉडची लव्हस्टोरी
स्टुअर्ट ब्रॉड आणि मॉली किंग यांची प्रेमकहानी बॉलीवूड चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. ब्रॉडने 2006 मध्ये इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तो 2012 मध्ये मॉली किंगला भेटला होता. बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 मध्ये ते वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण एका भेटीनंतर ब्रॉड आणि मॉली किंग पुन्हा एकत्र आले. मॉली एक प्रसिद्ध इंग्रजी गायिका आणि मॉडेल आहे. दोघेही पहिल्याच भेटीत एकमेकांच्या प्रेमात पडले. मॉली रेडिओ प्रेझेंटर देखील आहे.
View this post on Instagram
ब्रॉड पुन्हा वडील होणार आहे
2020 मध्ये, पुन्हा एकदा दोघांमध्ये सर्व काही ठीक झाले आणि जानेवारी 2021 मध्ये त्यांनी साखरपुडा केला. मॉली आणि ब्रॉड नोव्हेंबर 2022 मध्ये पहिल्यांदा पालक बनले होते. त्यांच्या घरी मुलीचा जन्म झाला होता. त्यानंतर आता ब्रॉड पुन्हा एकदा वडील होणार आहे. ब्रॉडची गर्लफ्रेंड मॉली किंगने बेबी बंपसोबत स्टुअर्ट ब्रॉड आणि मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “माझी मुलगी आता मोठी बहीण होणार आहे. आम्ही तुला भेटण्यास उत्सुक आहोत.”
महत्त्वाच्या बातम्या-
कसोटीमध्ये पुनरागमन करण्यासाठी पंतला द्यावी लागणार अग्नीपरिक्षा, ‘या’ देशांतर्गत स्पर्धेत मिळणार टक्कर
“दोन चार कपडे काढले असते तर वजन…”, विनेश फोगटबद्दल भाजप नेत्याची संतापजनक पोस्ट
‘हा’ दिग्गज खेळाडू 12 वर्षांनंतर प्रथमच खेळणार देशांतर्गत क्रिकेट!