इंग्लंडचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. ऍशेस 2023 मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना संघाला जिंकवून दिल्यानंतर ब्रॉड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही महान गोलंदाजांमध्ये ब्रॉडचे नाव घेतले जाते. अजून काही वर्ष तो क्रिकेट खेळू शकत होता, असा समज असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. स्वतः ब्रॉड देखील असाच विचार करतो. त्याने नुकतीच याविषयी प्रतिक्रिया देखील दिली.
ऍशेस 2023 (Ashes 2023) मालिकेत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाहुण्या ऑस्ट्रेलियाला, तर तिसऱ्या आणि पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजय मिळाला. चौथा कसोटी सामना पावसामुळे निकाली लागला नाही. स्टअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याने आधी माहिती दिल्याप्रमाणे ऍशेस मालिका संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. शेवटच्या सामन्यापर्यंत ब्रॉड एखाद्या युवा गोलंदाजाला लाजवेल अशा फॉर्ममध्ये होता. विशेष म्हणजे कारकिर्दीतील शेवटच्या चेंडूवर त्याला विकेट मिळाली. ब्रॉडच्या मते तो अजून काही वर्ष क्रिकेट खेळू शकत होता. पण वेळेत निवृत्ती घेतल्यामुळे तो शेवटपर्यंत संघात राहू शकला आणि सन्मानपूर्वक क्रिकेटला अलविदा करू शकला.
स्काय स्पोर्ट्सला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत स्टुअर्ट ब्रॉड म्हणाला, “मी मनातल्या मनात विचार करतो की, मी अजून काही वर्ष खेळू शकत होता. पण मला नेहमी सर्वोत्कृष्ट बनून राहायचे होते. इंग्लंड संघाची जर्सी घालूनच कारकिर्दीचा शेवट करायचा होता. हा निर्णय (निवृत्ती) स्वतः घेऊ शकेल यासाठी स्वतःला सक्षण ठेवायचे होते. मला त्यासाठी त्यासाठी प्रयत्न करायचे होते आणि योग्य वेळी क्रिकेट सोडायचे होते. मी या गोष्टी करू शकलो. मला आज कुठलाच पश्चाताप नाहीये. माझ्या मते निवृत्तीचा निर्णय योग्यच होता. कारण माझे सहकारी खेळाडू इंग्लंडची कॅप आणि जर्सी घालून शेवटी माझ्यासोबत उभे होते. ‘मी पुन्हा कधीच असे करू शकणार नाही,’ हा विचार करून बरे वाटते.”
दरम्यान, ब्रॉडच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली, तर त्याने 167 कसोटी, 121 वनडे आणि 56 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 604, वनडे क्रिकेटमध्ये 178 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 65 विकेट्स घेतल्या. एकंदरीत विचार केला, तर ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमद्ये 847 विकेट्स घेतल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्सच्या बाबतीत ब्रॉड आठव्या क्रमांकावर आहे. तर त्याचा सहकाही आणि मित्र जेम्स अँडरस या यादीत 977 विकेट्सह तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Stuart Broad’s reaction to retirement from international cricket)
महत्वाच्या बातम्या –
मुंबई खिलाडीसचा राजस्थान वॉरियर्सवर रोमहर्षक, तर तेलुगू योद्धासचा ओडिशा जगरनॉट्सवर निसटता विजय
वर्ल्डकप फायनलमधील पराभवानंतर चांगलाच निराश झालेला विराट! मैदानातील व्हिडिओ पहिल्यांदाच आला समोर