---Advertisement---

Video : “आता तुझ्याकडून बॅट घ्यावी लागेल”, सूर्यकुमारने ‘त्या’ व्हिडीओमुळे चहलला केले ट्रोल

On: शनिवार, नोव्हेंबर 21, 2020 2:17 PM
---Advertisement---

कोरोना या साथीच्या आजाराच्या निर्बंधांमुळे भारतीय क्रिकेट संघाने बऱ्याच दिवसांपासून कोणताही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला नाही. आता जवळपास सात महिन्यांनंतर भारत आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. 27 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात होणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना खेळाला जाईल.

या सामन्याआधी ऑस्ट्रेलियामध्ये खेळाडू कसून सराव करत आहेत. काही दिवसांपूर्वी विराट कोहली, वृद्धिमान साहा, टी-नटराजन या खेळाडूंचे नेटमध्ये सराव करतानाचे व्हिडीओ सामोर आले होते. आता भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलनेही याने त्याचा सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र, या व्हिडिओमुळे तो ट्रोल झाला आहे. त्याच्या व्हिडिओवर अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी मजेशीर कमेंट केल्या आहेत

युझवेंद्र चहलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो नेटमध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे. फिरकीपटू असलेल्या चहलने फलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केल्यामुळे चाहत्यांना आश्चर्यचं वाटलं.

https://www.instagram.com/p/CHw0JhBhnxk/?utm_source=ig_web_copy_link

डेल स्टेनने केली टिप्पणी

त्याचा हा व्हिडिओ पाहून दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन म्हणाला की, “वेगवान फिरकीचा सामना करतोय का?”
स्टेनला उत्तर देताना चहल म्हणाला की, “ही बाब गुपित आहे.”

Screengrab: Instagram/Yuzvendra Chahal

सूर्यकुमार यादवने केले ट्रोल
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने या व्हिडिओवर टिप्पणी करताना म्हटले की, “आता तुझ्याकडून बॅट घ्यावी लागेल.”

Screengrab: Instagram/Yuzvendra Chahal

रशिद खान यानेही केली टिप्पणी
या व्हिडिओवर टिप्पणी करताना युवा फिरकीपटू रशिद  म्हणाला की, “आपण गोलंदाज म्हणूनच चांगले आहोत.”

Screengrab: Instagram/Yuzvendra Chahal

चहल हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे आणि टी20 सामन्यांसाठी भारतीय संघाचा भाग आहे.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी भारतीय संघ 3 सामन्यांची वनडे मालिका आणि 3 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

“तो मिलियन डॉलरचा खेळाडू”, आर अश्विनने उधळली पाकिस्तानच्या क्रिकेपटूवर स्तुतीसुमने

‘हे’ खेळाडू ठरवतील भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल, भारताच्या दिग्गजाची भविष्यवाणी

ठरलं! ‘या’ मैदानावर होणार ऑस्ट्रेलिया – भारत पहिला कसोटी सामना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---