क्रिकेटकडे नेहमी पुरुषांचे वर्चस्व राहिलेला खेळ म्हणून पाहिले गेले आहे. मात्र, मागील काही काळापासून या गोष्टीला छेद मिळालेला दिसून येतो. गेल्या ५-६ वर्षापासून अनेक दर्जेदार महिला क्रिकेटपटूंनी आपल्या खेळाने क्रिकेट चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. तसेच, अनेक देशांमध्ये व्यावसायिक महिला टी२० लीगदेखील सुरू झाल्या आहेत. आता, महिला क्रिकेटसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इंग्लंड विरुद्ध श्रीलंका यांच्या पुरुष संघांदरम्यान होणाऱ्या टी२० मालिकेत आता महिला पंच पंचगिरी करताना दिसतील.
ही महिला पंच रचणार इतिहास
इंग्लंडच्या महिला पंच स्यू रेडफर्न कार्डिफमध्ये इंग्लंड विरुद्ध श्रीलंका त्यांच्यातील पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात चौथे पंच म्हणून काम करतील. यामुळे इंग्लंडमधील पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात काम करणाऱ्या त्या पहिल्या महिलाही ठरतील. ४३ वर्षीय स्यू या ऍलेक्स वार्फ यांची जागा घेतील.
वार्फ सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात राखीव पंच म्हणून काम पाहत आहेत. हा अंतिम सामना साऊथॅम्प्टनमध्ये खेळला जात असून, राखीव असलेल्या सहाव्या दिवसापर्यंत हा सामना जाण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय सामन्यांचा आहे अनुभव
रेडफर्न आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवी पंच आहेत. गेल्या आठवड्यात ब्रिस्टल येथे खेळल्या गेलेल्या इंग्लंड आणि भारत महिला संघ यांच्यातील कसोटी सामन्यातही त्या पंच म्हणून काम पाहत होत्या. त्यांनी आतापर्यंत ३२ महिला आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंच म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, १२ सामन्यात त्या टीव्ही पंच होत्या. आपल्या क्रिकेट कारकीर्दीत रेडफर्न यांनी सहा कसोटी आणि १५ वनडे सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले होते.
या होत्या पहिल्या महिला पंच
ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात एससीजी येथील दुसर्या कसोटी सामन्यात चौथी पंच म्हणून काम क्लेअर पोलोसाक यांनी काम केले होते. त्या पुरुष आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी करणाऱ्या पहिल्या महिला पंच होत्या. २०१६ मध्ये रेडफर्न आणि जॅकलिन विल्यम्स या दोघींनीही ओमान आणि नायजेरिया यांच्यातील वर्ल्ड क्रिकेट लीग विभाग-५ सामन्यात पंच म्हणून कामगिरी बजावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: विराट कोहलीला भर मैदानात वाजली थंडी, रोहितने दिली मजेदार रिऍक्शन
लईच भारी! ‘म्युजिक डे’निमित्त ‘मास्टर ब्लास्टर’ने केला गायक सोनू निगमसोबतचा थ्रोबॅक व्हिडिओ शेअर
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स करणार पुनरागमन, ‘या’ सामन्यातून उतरणार मैदानावर