आतापर्यंत आपण असे ऐकले किंवा वाचले असेल की, एखादा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे थांबवण्यात आला. तसेच, ओल्या मैदानामुळे सामना रद्द करण्यात आला. मात्र, यावेळी विषय जरा वेगळा आहे. कारण, ऑस्ट्रेलियामध्ये पावसामुळे नाही, तर उन्हामुळे अंतिम सामना थांबवला गेला. ही विचित्र घटना ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या महिला बिग बॅश लीग स्पर्धेत घडली आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेमके काय घडले?
झाले असे की, नॉर्थ सिडनी ओव्हलमध्ये महिला बिग बॅश लीग (Womens Big Bash League) स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (दि. 26 नोव्हेंबर) खेळला गेला. हा सामना ऍडलेड स्ट्रायकर्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स (Adelaide Strikers vs Sydney Sixers) संघात पार पडला. सिडनी सिक्सर्स संघ जेव्हा आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा सामना निश्चित वेळेत सुरू होऊ शकला नाही. जेव्हा समालोचन पॅनेलकडून मैदानावरील माईकवर खेळाडूला याबाबत विचारले गेले, तेव्हा स्ट्राकर्स संघाची गोलंदाज अमांडा जेड वेलिंग्टन हिने संवाद साधला. ती म्हणाली की, “चला यार, हे क्रिकेट आहे. मला कळत नाहीये की, आपण वाट का पाहत आहोत?”
The game has been temporarily paused for … sunlight in an awkward position crossing the pitch ☀️
Roving reporter Amanda-Jane Wellington on the ground getting all the latest updates for us #WBBL08 pic.twitter.com/A0DZr3E6BO
— 7Cricket (@7Cricket) November 26, 2022
सिडनी सिक्सर्सची फलंदाज सूझी बेट्स हिने उत्तर देताना म्हटले की, जोपर्यंत तिला व्यवस्थित दिसणार नाही, तोपर्यंत ती फलंदाजी कशी करणार? तसं पाहिलं, तर ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा कडक उन्हामुळे एखादा सामना रोखण्यात आला आहे. न्यूझीलंडचे नेपियर मैदान हे यासाठीच ओळखले जाते. 2019मध्ये भारताविरुद्धच्या एका सामन्यातही अशाचप्रकारे उन्हामुळे फलंदाजाला त्रास होत होता, त्यामुळे सामना रोखण्यात आला होता.
सामन्याचा आढावा
सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर ऍडलेड स्ट्रायकर्सने डिएंड्रा डॉटिनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 5 विकेट्स गमावत 147 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्स संघाचा डाव 137 धावांवरच संपुष्टात आला. अशाप्रकारे 10 धावांमुळे हा सामना ऍडलेड स्ट्रायकर्स संघाने आपल्या खिशात घालत विजेतेपदाची ट्रॉफी उंचावली. (sun stops play in wbbl final see video here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत- न्यूझीलंड संघातील दुसऱ्या वनडेत पाऊस घालणार का रोडा? जाणून घ्या कसे असेल वातावरण
जगभरातील गोलंदाजांमध्ये सूर्याने घेतले ‘या’ पाकिस्तानी दिग्गजाचे नाव, वाचा कोण आहे तो खेळाडू






