पुणे: सनगार्ड, यार्डी सॉफ्टवेअर या संघांनी प्रथम व्हिन्टेज आयटी कप टी-२० क्रिकेट स्पर्धेत आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली.
नेहरू स्टेडियमवर या लढती झाल्या. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत सनगार्ड संघाने कॉग्निझंट संघावर १४ धावांनी मात केली. यात सनगार्ड संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १५४ धावा केल्या. यात कौस्तुभ बाकरेने ३३ चेंडूंत ३ षटकार व १ चौकारसह सर्वाधिक ४५ धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना कॉग्निझंट संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १४० धावाच करता आल्या. यानंतर
दुस-या लढतीत यार्डी सॉफ्टवेअर संघाने मर्स्क संघावर सहा गडी राखून विजय मिळवला. मर्स्क संघाने प्रथम फलंदाजी करताना ८ बाद १५१ धावा केल्या. यात वैभव महाडिकने ४४ चेंडूंत ८ चौकारांसह ५९ धावा केल्या. यानंतर यार्डी संघाने विजयी लक्ष्य १९.४ षटकांत ४ गडींच्या मोबदल्यात पूर्ण केले. यात स्वप्नील घाटगेने ३२ चेंडूंत ७ चौकार व ७ षटकारांसह ५३, तर अमित राडकरने ३७ चेंडूंत ५ चौकारांसह ४० धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक – १) सनगार्ड – २० षटकांत ५ बाद १५४ (कौस्तुभ बाकरे ४५, पार्थ शर्मा ३९, पुनीत करण १-३५, दत्तप्रसाद खानोलकर १-३०, अमन वाणी १-९, राकेशसिंग १-२७) वि. वि. कॉग्निझंट – २० षटकांत ८ बाद १४० (नितेश सप्रे ३५, वैभव राजूरकर २६, पुनीत करण २१, गौरव कुलकर्णी नाबाद २०, कौस्तुभ बाकरे २-३४, कुणाल शहा २-२३).
२) मर्स्क – २० षटकांत ८ बाद १५१ (वैभव महाडिक ५९, राघव त्रिवेदी २७, प्रसाद गिरकर २२, प्रमोद दावंडे २-१३, चेतन राणे २-१३) पराभूत वि. यार्डी सॉफ्टवेअर – १९.४ षटकांत ४ बाद १५२ (स्वप्नील घाटगे ५३, अमित राडकर ४०, पंकज एल. नाबाद ३६, अभिषेक राय १-३९, प्रसाद गिरकर १-२९, वेंकटेश अय्यर १-२४)