---Advertisement---

राहुल-अथियाच्या नात्यावर सुनिल शेट्टींनी सोडले मौन; म्हणे, ‘हे जोडपं एकमेकांना शोभून दिसतं’

On: शनिवार, जुलै 17, 2021 11:12 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुल आणि बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हे दोघे मागील काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत अशी अफवा पसरली होती. दोघेही सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात. ते आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांच्या फोटो शेअर करत असतात. त्याचबरोबर एकमेकांच्या फोटोला कमेंट देखील करताना दिसून येतात.

परंतु अथिया शेट्टी आणि केएल राहुलने अजूनही आपल्या नात्याचा अधिकृतपणे स्वीकार केलेला नाही. जेव्हा केव्हा हे दोघेही एकमेकांचे फोटो किंवा पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करतात तेव्हा ते नेहमी लोकांच्या नजरेत येतात.

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेला जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना इंग्लंडमध्ये आयोजित केला होता. यावेळी बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना परिवारासोबत घेऊन जाण्याची परवानगी दिली होती. तेव्हा केएल राहुलने अधिकृतपणे अथिया शेट्टीही आपली जोडीदार असल्याचे कबूल केले होते. आता याबद्दल स्वत अथियाचे वडील आणि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते सुनिल शेट्टी यांनी मौन सोडले आहे.

सुनील शेट्टी यांनी दिली प्रतिक्रिया
सुनील शेट्टी एका माध्यमाशी बोलताना म्हणाले की, “हो. अथिया सध्या इंग्लंडमध्येच आहे. परंतु ती तिथे भाऊ अहानसोबत सुट्टीसाठी गेली आहे. दोघेही भाऊ-बहिण इंग्लंडमध्ये सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले आहेत. बाकी तुम्ही बघू शकता.”

या मुलाखतीदरम्यान सुनील शेट्टी यांना मुलगी अथियाच्या रिलेशनशिपबद्दल पसरलेल्या अफवांवर एक प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी त्यावर उत्तर देण्यास टाळण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुल आणि अथियाची जोडी चांगली दिसत असल्याचेही त्यांनी मान्य केले. अथिया आणि राहुल हे दोघेही एका ब्रँडचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ आहेत.

या मुद्दावर स्पष्टीकरण देत सुनील शेट्टी म्हणाले की, ”जाहिरातीबद्दल बोलायचे झाले, तर एका आंतरराष्ट्रीय ब्रँडने त्या दोघांनाही अ‍ॅम्बेसेडर म्हणून निवडले आहे. ते एकमेकांना साजेसे आणि शोभणारे जोडपे आहे. ब्रँडच्या दृष्टिकोनातून बोलायचे झाले तर ते चांगले काम करत आहेत. मला जाहिरातीमध्ये हे दोघे एकत्र खूप चांगले दिसत आहेत.”

महत्त्वाच्या बातम्या-

आम्ही प्रेमावर प्रेम केलं…, भारतीय अष्टपैलू दुबे चढला बोहल्यावर; मैत्रीण अंजुम खानशी बांधली लग्नगाठ

बळींचा पंच घेत वयाची तिशी पार केलेल्या बांगलादेशच्या ‘या’ गोलंदाजाने रचला इतिहास, ठरला पहिलाच

‘पुजाराला संघातून वगळलं जातंय, मला विश्वासच बसत नाही,’ माजी क्रिकेटरचे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---