---Advertisement---

आम्ही प्रेमावर प्रेम केलं…, भारतीय अष्टपैलू दुबे चढला बोहल्यावर; मैत्रीण अंजुम खानशी बांधली लग्नगाठ

On: शनिवार, जुलै 17, 2021 7:34 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे याने शुक्रवारी (16 जुलै) त्याची मैत्रीण अंजुम खानसोबत लगीनगाठ बांधली आहे. मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये  मुस्लिम रिती रिवाजासह त्यांनी लग्न केले आहे. याची माहिती स्वतः शिवमने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत दिली आहे. या नवदाम्पत्यावर चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

या अष्टपैलू खेळाडूने सोशल मीडियावर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या पोस्ट केलेल्या फोटोतून तो मुस्लिम रीति-रिवाजांचे पालन करत लग्न करताना दिसत आहे. शिवमची पत्नी मुस्लिम कुटुंबातील असून तिचे नाव अंजुम खान असे आहे. एका फोटोत पत्नी अंजुमप्रमाणे शिवमही हात उचलून दुवा मागताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत हे दाम्पत्य एकमेकांच्या हातात अंगठी घालताना स्मितहास्य करताना दिसत आहे.

लग्नाचे फोटो शेअर करत शिवमने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘आम्ही प्रेमावर प्रेम केले आहे, जे प्रेमापेक्षाही खूप जास्त होते. आता आमचे नवे आयुष्य सुरु होत आहे. जस्ट मॅरिड 16-07-2021…!’

https://www.instagram.com/p/CRZLqy5sNtM/?utm_source=ig_web_button_share_sheet

https://www.instagram.com/p/CRZJswALoYB/?utm_source=ig_web_button_share_sheet

शिवम दुबेने ऑक्टोबर 2019 मध्ये बांगलादेश विरूद्धच्या मालिकेसाठी भारताच्या टी20 आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळाले होते. त्याने 3 नोव्हेंबर 2019 रोजी बांगलादेश विरुद्ध टी20 सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी दुबेला भारताच्या वनडे संघात स्थान देण्यात आले. त्याने 15 डिसेंबर 2019 रोजी वेस्ट इंडीज विरूद्ध भारताकडून एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. परंतु त्याला पुढे जास्त क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली नाही.

मात्र आयपीएलमध्ये तो दरवर्षी खेळताना दिसतो. शिवम हा सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये राजस्थान रॉयल संघाचे प्रतिनिधित्व करतो.

महत्त्वाच्या बातम्या-

‘हार्दिक भविष्यात धोनीसारखा खतरनाक फिनिशर बनेल’; पाहा कोणी व्यक्त केलाय विश्वास

मुरलीधरनचा लेक मैदान गाजवण्यासाठी होतोय सज्ज, त्याच्या गोलंदाजीत तुम्हालाही दिसेल बापाची छबी

‘मी केकेआरसाठी समस्या होतो, पण त्यावेळी मॉर्गनला कर्णधार बनायचे नव्हते,’ कार्तिकचा उलगडा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---