भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्याच्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाच्या रणनीतीवर सुनील गावस्करांनी संताप व्यक्त केला आहे. ज्यावर रिषभ पंत कोहलीसमोर फलंदाजीला आल्यावर गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यशस्वी जयस्वाल आऊट होताना कोहली बॅटिंगला येईल अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. पंतला कोहलीच्या आधी फलंदाजीसाठी पाठवले. भारताच्या या रणनीतीवर गावस्कर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गावस्कर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. तुम्ही अशा व्यक्तीबद्दल बोलत आहात ज्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना कसोटी क्रिकेटमध्ये जवळपास 9000 धावा केल्या आहेत आणि इथे पंतला त्याच्या आधी फलंदाजीसाठी पाठवण्यात आले.”
सुनील गावस्कर यांच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. पंत काही खास करू शकला नाही आणि केवळ 9 धावा करून बाद झाला. त्याचवेळी भारताचा दिग्गज विराट कोहलीने 47 धावांची खेळी केली. कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27 हजार धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
विराट सातत्याने जुने विक्रम मोडत असून आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक कामगिरी केली आहे. 35 वर्षीय क्रिकेटपटूने आपल्या 535व्या सामन्यात (594 डाव) ही कामगिरी केली. भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरने 114 कसोटी, 295 एकदिवसीय आणि 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळल्यानंतर 623 डावात 27 हजार धावांचा टप्पा पार केला. तर कोहली सर्व फॉरमॅटमध्ये भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे जगातील महान फलंदाज आणि जगातील सर्वात दिग्गज फलंदाजांपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या बांग्लादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी तुफानी फलंदाजी करताना संघाने 52 धावांच्या आघाडीसह डाव घोषित केला. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बांग्लादेशनेही दोन गडी बाद केले. दुसऱ्या डावात बांगलादेशची धावसंख्या 26/2 आहे. कानपूर कसोटी सामन्यात पहिल्या दिवसापासूनच पाऊस खलनायक ठरला आणि त्यामुळे बहुतांश वेळा खेळ होऊ शकला नाही. मात्र पावसामुळे अनिर्णित राहणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाने उत्साह वाढवला असून आता टीम विजयाच्या जवळ आहे.
हेही वाचा-
अभिषेकसोबत रिंकू सिंग ओपनिंग करणार! टी20 साठी माजी क्रिकेटपटूचा मास्टर प्लॅन
रहाणेपासून- ऋतुराजपर्यंत इराणी कपमध्ये दिसणार अनेक स्टार्स, या ठिकाणी पाहा लाईव्ह सामना
कानपूर कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी षटकारांचा जोरदार पाऊस, टीम इंडियाने केला विश्वविक्रम