दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला एकदिवसीय मालिकेपूर्वी कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला होता. नंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजिनामा देखील दिला. भारतीय संघासाठी हा दौरा फारसा यशस्वी ठरला नाही. एकदिवसीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे भारतीय संघाची कमान केएल राहूल सांभाळत आहे. एकदिवसीय मालिकेचे दोन्ही सामने भारताने गमावले आहेत. तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना २३ जानेवारीला केपटाउन येथे खेळला जाणार आहे. या मालिकेत भारतासाठी मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश डोकेदुखी ठरली आहे. दरम्यान, भारतीय संघातील फलंदाजीबद्दल माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यावर त्यांचं मत मांडले आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्याहून परत आल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजसोबत मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. त्या मालिकेमध्ये रोहित शर्मा पुर्णवेळ कर्णधार म्हणून प्रथमच संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. दरम्यान, भारताला मधल्या फळीतील कामगिरी सुधारावी लागणार आहे.
गावसकरांचे असे मत आहे की, माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनंतर भारताला सर्वोत्तम फिनीशर तयार करण्याची गरज आहे. खूप काळापासून असे मानले जात होते की, हार्दिक पंड्या ही भूमिका साकारु शकेल. पण काही काळापासून हा अष्टपैलू खराब फाॅर्ममध्ये आहे आणि खेळापासून दुर आहे. अशा परिस्थीतीत भारताला हार्दिक पंड्याच्या पुढील खेळाडू पाहण्याची गरज भासू शकते.
अधिक वाचा – गावसकरांचा रोहितला कसोटी कर्णधार करण्याला नकार; ‘ही’ गोष्ट ठरलीये नकाराला मोठे कारण
माजी कर्णधार गावसकरांचे असे मत आहे की, धोनीनंतर सर्वोत्तम फिनीशरची भूमिका यष्टीरक्षक रिषभ पंत हा बजावू शकतो. पंतने नुकतीच पार पडलेल्या एकदिवसीय सामन्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. शुक्रवारी पार्ल येथे पार पडलेल्या दुसऱ्या सामन्यात पंतने शानदार खेळी खेळत ८५ धावा केल्या. असे असताना गावसकरांनी एका वृत्तपत्रात लिहले की, पंतचा ६ व्या क्रमांकावर सर्वोत्तम वापर केला जाऊ शकतो.
व्हिडिओ पाहा – सचिन-कांबळीच्या करामतीने गांगुलीच्या रुममध्ये झालेलं पाणीच पाणी
ते म्हणाले की, पहिल्या सामन्यात शिखर धवन आणि विराट कोहली यांच्या शानदीर भागीदारीनंतर मधली फळी कोलमडली, कारण रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर संघाला पुढे नेण्यात असमर्थ ठरले. पंतला अलीकडच्या काळात एकदिवसीय सामन्यांत चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात येत आहे. तेथे त्याला धैर्य आणि आक्रमकतेचे योग्य मिश्रण सापडत नाही. त्यामुळे मला वाटते की त्याला सहाव्या क्रमांकावर फिनीशर म्हणून वापरले जावे. जिथे तो सामन्याच्या परिस्थीतीची काळजी न करता लांब लांब शाॅट्स खेळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताला धक्का! १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अखेरच्या साखळी सामन्यातून कर्णधारासह ‘हे’ ५ खेळाडू बाहेर
कर्णधार बदलला पण रिझल्ट तोच! बाह्यदेशात वनडे मालिकेत सपाटून मार खाण्याची परंपरा कायम, पाहा यादी
आयपीएल २०२२: अजूनही तीन संघ ‘सेनापती’च्या शोधात; ‘हे’ तिघे शर्यतीत आघाडीवर