भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज सुनील गावसकर यांना सध्या चाहत्यांच्या जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब संघात आयपीएलचा सहावा सामना पार पडला. यावेळी समालोचन करताना गावसकरांनी बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माचे नाव घेऊन टिप्पणी केली होती. त्यामुळे त्यांना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलींगला सामोरे जावे लागले.
तसेच गावसकरांच्या या वक्तव्यावर भडकलेल्या अनुष्कानेही तिच्या अधिकृत इस्टाग्राम अकाउंटवरुन प्रतिक्रिया दिली होती. अनुष्का तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलेल्या पोस्ट मध्ये म्हणाली, “श्री. गावस्कर, तुम्ही जे बोलले ते चांगलं नव्हतं. पतीच्या वाईट प्रदर्शनामुळे त्याच्या पत्नीवर आरोप आरोप केले. तुम्ही असं का केल हे सांगू शकता का?? मला माहिती आहे की समालोचन करताना कोणत्याही क्रिकेटपटूच्या वैयक्तिक जीवनाचा तुम्ही आदर केला आहे. तुम्हाला असे वाटत नाही का की माझाही आदर करणे आवश्यक आहे?”
पुढे ती म्हणाली होती “मला खात्री आहे की काल रात्री माझ्या पतीच्या कामगिरीवर भाष्य करण्यासाठी तुमच्या मनात अनेक वाक्ये आणि शब्द आले असतील, किंवा माझ्या नावाचा उल्लेख केल्यामुळेच तुमच्या टिप्पणीला जास्त महत्व मिळत असेल. हे 2020 आहे आणि माझ्यासाठी अजूनही गोष्टी बदलल्या नाहीत. क्रिकेटमध्ये मला ओढणे आणि अशा प्रकारे एकतर्फी भाष्य करणे कधी थांबणार??”
परंतू शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात दुबई येथे झालेल्या सामन्यादरम्यान गावसकरांनी या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. Sunil Gavaskar Clarified His Statement About Virat-Anushka
“मी विराट-अनुष्काविषयी कसलेही अश्लिल भाष्य केले नाही. मी केवळ लॉकडाऊनमध्ये अनुष्काच्या गोलंदाजीवर विराटने केलेल्या फलंदाजीचा उल्लेख केला होता. पण अनेकांनी याचा वेगळा अर्थ घेतला. मी जे काही बोललो होतो, ते पुन्हा तुमच्या कानाने लक्ष देऊन ऐका, डोळ्याने पहा आणि नंतरच बोला,” असा सल्ला गावसकरांनी ट्रोलर्सला दिला.
गुरुवारी आयपीएलच्या १३ व्या हंगामातील सहावा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन संघादरम्यान झाला होता. या सामन्यादरम्यान बेंगलोरचा कर्णधार विराटने क्षेत्ररक्षण करताना दोन झेल सोडले व फलंदाजीतही तो लवकर बाद झाला.
अशात या सामन्यात समालोचन करत असलेले गावसकर विराटच्या खराब कामगिरीमुळे गमतीने बोलताना म्हणाले होते की, “त्याने लॉकडाऊनमध्ये फक्त अनुष्काने फेकलेल्या चेंडूचाच सराव केला आहे.”
गावसकरांच्या या विधानाचा प्रेक्षकांनी चुकिचा अर्थ घेतला आणि त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली. पण आता गावसकरांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर प्रेक्षक व अनुष्काची प्रतिक्रिया काय येणार, हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
विक्रमवीरांच्या यादीत थेट दुस-या स्थानी, पाहा पृथ्वी शाॅची खास कामगिरी
एकचं मन कितीदा जिंकशील रे.! धोनीचा ‘हा’ भन्नाट कॅच पाहून तुम्हीही असंच म्हणाल
आरसीबीविरुद्ध शतकी खेळी केल्याबद्दल केएल राहुलचे रोहित शर्माने केले कौतुक, म्हणाला…
ट्रेंडिंग लेख –
वाढदिवस विशेष! भारताच्या फिरकी गोलंदाजीचे ‘मेरूमणी’ बिशनसिंह बेदी
‘या’ पाच कारणांमुळे विराट कोहलीच्या आरसीबी संघाचा पंजाबविरुद्ध झाला पराभव
आयपीएल २०२० च्या हंगामात सर्वाधिक किंमत मिळालेले फिरकीपटू, एक नाव आहे धक्कादायक