भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर आणि माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग हे दोघेही त्यांच्या मनातील गोष्टी उघडपणे बोलण्यासाठी ओळखले जातात. भारत आणि इंग्लंड या दोन संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत समालोचकांच्या यादीत हे दोघेही आहेत. सामन्यादरम्यान समालोचन करताना या दोघांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीविषयी बोलले आहेत. गावस्करांनी गांगुलीविषयी एक तक्रार केली आहे, ज्यात सेहवागनेही त्यांची साथ दिली.
नाॅटिंघममधील कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान समालोचन करताना गावस्कर आणि सेहवाग त्यादिवशीचा सामना आणि इतर विषयावर चर्चा करत होते. यादरम्यान दोघांसाठीही कोलकात्याचे सुप्रसिद्ध मिष्टी दही ठेवले होते. सेहवागनेते खायला सुरुवात केली आणि गावस्करांनी मिष्टी दहीचा जुना किस्सा सांगितला. गावस्करांने सांगितलं की, जेव्हा तो संघाचा कर्णधार होता, तेव्हा कोलकात्याला गेल्यावर गांगुलीचे वडील मिष्टी दही आणि रसगुल्ल्यांची सोय करायचे,
गावस्कर म्हणाले, “कोलकत्याला गेलो, तर मिष्टी दही नक्की खातो. जेव्हा मी भारतीय संघाचा कर्णधार होतो आणि कोलकात्याला जायचो, तेव्हा आपले आताचे बीसीसीआय आध्यक्ष सौरव गांगुलीचे वडील तेव्हा बंगाल क्रिकेट असोसीएशनचे सचिव होते. ते आम्हाला विमानतळावर घ्यायला यायचे, आणि ज्या हॉटेलमध्ये आम्ही थांबायचो, त्याच्या फ्रीजमध्ये मिष्टी दहीची हंडी ठेवलेली असायची. एवढेच नाही, रसगुल्लाही. फक्त एक तक्रार आहे आणि आशा करतो की ऐकणारे ऐकतील. त्या दिवसांत जे क्रिकेट असोसिएशनचे सचिव होते, ते एवढी मोठी हंडी आणायचे. आताचे बीसीसीआय अध्यक्ष काहीच आणत नाहीत.”
????????@SGanguly99 are you listening? ????
We can let you know where to find them 😉Catch all the #ExtraaaInnings fun LIVE on
???? Sony SIX, Sony TEN 3, Sony TEN 4#BackOurBoys #ENGvIND #INDvENG @virendersehwag pic.twitter.com/jwnCBNysWa— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 6, 2021
यावर वीरेंद्र सेहवाग म्हणतो की, “दादा ऐकत आहात का तुम्ही, आता पुढच्या वेळी जेव्हा सुनील गावस्कर किंवा वीरेंद्र सेहवाग भेटतील, तेव्हा मिष्टी दहीचे मोठे भांडे आणि रसगुल्ला जरूर घेऊन या.”
सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग आणि सौरव गांगुली हे तिघेही दिग्गज क्रिकेटपटू आहेत. गावस्करांच्या नावावर कसोटीत सर्वप्रथम १०००० धावा करण्याचा विक्रम आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-बिचारा कोहली! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडच्या प्रेक्षकांचा उर्मटपणा, ‘या’ गोष्टीवरून उडवली भरपूर खिल्ली
-रिषभच्या छोटेखानी खेळीचा ‘हा’ पाकिस्तानी दिग्गजची बनला चाहता, केलं तोंडभरुन कौतुक
-IND vs ENG: रोहितचा कसोटी संघातून कटणार पत्ता? ‘हा’ युवा खेळाडू राहुलसह करणार ओपनिंग






