देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण चमकदार कामगिरी करणारा फलंदाज म्हणून सरफराज खान हे नाव आघाडीवर आहे. सरफराज मागील काही हंगामांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. त्याची कामगिरी पाहता, बांगलादेश दौरा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीत जागा न मिळाल्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी त्याला संधी मिळण्याची आशा होती. मात्र, भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी या प्रतिभावान युवा खेळाडूकडे दुर्लक्ष केले आहे. बीसीसीआयच्या निवडकर्त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सुनील गावसकर चांगलेच संतापले आहेत. त्यांनी निवडकर्त्यांवर प्रश्नांचा भडीमार केला आहे.
काय म्हणाले गावसकर?
माध्यमांशी बोलताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी म्हटले की, “सरफराज खान मागील तीन हंगामांपासून जवळपास 100च्या सरासरीने धावा करत आहे. त्याला संघात जागा मिळवण्यासाठी काय करावे लागेल? होऊ शकते की, त्याला अंतिम अकरामध्ये जागा मिळणार नाही, पण संघात त्याची निवड झालीच पाहिजे होती.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “त्याला वाटले पाहिजे की, त्याच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे. जर असे नसेल, तर रणजी ट्रॉफी खेळणे बंद केले पाहिजे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून जर तुम्ही कसोटीत संघात जागा मिळवणार असाल, तर रणजी ट्रॉफीचा काहीच फायदा नाहीये.”
सरफराज खानची कामगिरी
सरफराज खान (Sarfaraz Khan) याने 2022-23 रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) हंगामात 3 शतकांच्या मदतीने 6 सामन्यात 92.66च्या सरासरीने 556 धावा केल्या. या 25 वर्षीय फलंदाजाने 2021-22च्या रणजी हंगामातही 122.75च्या सरासरीने 982 धावा चोपल्या होत्या. यामध्ये 4 शतकांचा समावेश होता. याव्यतिरिक्त त्याने 2019-20च्या रणजी हंगामात 154.06च्या सरासरीने 928 धावा केल्या होत्या. अशाप्रकारे त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण 37 सामन्यात 79.65च्या सरासरीने 3505 धावा केल्या आहेत. यादरम्यान नाबाद 301 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.
अशात सरफराजला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने गावसकरांव्यतिरिक्त इतर दिग्गज खेळाडूही आगपाखड करत आहे. (sunil gavaskar criticise bcci selectors for sarfaraz khan not picked west indies tour read here)
महत्वाच्या बातम्या-
बटलर नावाचं वादळ इंग्लंडमध्ये घोंगावलं! बनला टी20 क्रिकेटमध्ये ‘असा’ भीमपराक्रम करणारा जगातील नववा खेळाडू
वसीम जाफरच्या प्रश्नांमुळे टीम इंडियाच्या निवडकर्त्यांना फुटेल घाम! संघ निवडीवर माजी सलामीवीर नाखुश