---Advertisement---

‘ना राष्ट्रीय संघासाठी काही केलं, ना आयपीएल फ्रँचायझीसाठी’, RRच्या खेळाडूला गावसकरांचा चिमटा

On: शुक्रवार, ऑक्टोबर 8, 2021 3:50 PM
---Advertisement---

गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ चा ५४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात पार पडला. कोलकाता नाइट रायडर्सने या सामन्यात मोठा विजय मिळवला. कोलकाताने राजस्थानला ८६ धावांच्या मोठ्या फरकाने विजय पराभूत केले. या विजयासोबतच कोलकाताने त्यांचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे. दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू राजस्थानचा क्रिस मॉरिस या सामन्यातही अपयशी ठरला. यानंतर भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकरांनी मॉरिसवर टीका केली आहे.

गावसकर स्टार स्पोर्ट्सवर बोलत होते. मॉरिसबाबत बोलताना ते म्हणाले की, “जेव्हा राजस्थान रॉयल्स संघाने त्याला विकत घेतले होते, तेव्हा त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि मला माहित आहे की, नेहमी दुसऱ्यांच्या अपेक्षेवर खरे उतरणे सोपे नसते. तो एक असा क्रिकेटपटू आहे, जो नेहमी शब्द देईल की, मी चांगले प्रदर्शन करेल. पण त्याने त्याच्या पूर्ण क्रिकेट कारकिर्दीत खूप किमी वेळा चांगले प्रदर्शन केले आहे. ही फक्त आयपीएलची गोष्ट नाहीये. जेव्हा तो दक्षिण आफ्रिकेसाठी खेळायचा, तेव्हाही त्याच्याकडून खूप अपेक्षा असायच्या. पण त्याने आजपर्यंत कधीच असे प्रदर्शन करून दिले नाही.”

मॉरिसमध्ये टेंपरामेंट किंवा फिटनेसबाबत समस्या आहे, याच कारणामुळे त्याला व्यवस्थित प्रदर्शन करता येत नाही. मला या खेळाडूच्या प्रतिभेवर कसलीच शंका नाही, असेही गावसकरांनी पुढे सांगितले आहे. मॉरिस यंजा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थानने त्याला लिलावात १६.२५ कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. पण संघाला त्याच्याकडून ज्याप्रकारची अपेक्षा होती मॉरिस त्याला पात्र ठरला नाही.

दरम्यान, गुरुवारच्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकली होती आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कोलकाताने प्रथम फलंदाजी केली आणि ४ विकेट्सच्या नुकसानावर १७१ धावा केल्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करताना रायस्थानचा संघ १६.१ षटाकांमध्ये सर्वबाद झाला. राजस्थान सामन्यात फक्त ८५ धावा करू शकला. क्रिस मॉरीसने सामन्यात राजस्थानसाठी दोन चेंडू खेळले आणि एकही धाव करू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

युवा जेमीमाचा ऑस्ट्रेलियात डंका, टी२०त धडाकेबाज खेळी करत ‘या’ विश्वविक्रमाला घातली गवसणी

‘या’ खेळाडूंमुळे मुंबई इंडियन्सचा प्लेऑफमधून पत्ता कट! टी२० विश्वचषकातही भारताची चिंता वाढवणार

चाहत्याचं कोहलीवरील ‘विराट’ प्रेम, हातात जळता कापूर ठेवून केली आपल्या हिरोची आरती; बघा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---