भारतात क्रिकेटवर प्रेम करणारे असंख्य लोक आहेत. तितकेच प्रेम ते खेळाडूंनाही देत असतात. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी सारख्या खेळाडूंना भारतातूनच नव्हे तर जगभरातून प्रेम मिळत असतात. तसेच सचिन तेंडुलकर आणि एमएस धोनी यांना तर भारतात देव म्हणून पुजले जाते. तर विराट कोहलीचा देखील चाहता वर्ग कमी नाहीये.
सध्या विराट कोहलीचा एक चाहता सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. विराटच्या प्रेमापोटी या चाहत्याने चक्क आपल्या हातावर कापुर जाळले आणि त्याची आरती केली. विराटसाठी असे करताना त्याला आपला तळहात भाजण्याचीही भीती वाटत नव्हती. या व्हिडीओवर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहेत.
हा व्हिडीओ विराट कोहली ट्रेंड्स नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केला आहे. बुधवारी (६ ऑक्टोबर) सनराययझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झालेल्या सामन्यानंतर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजय मिळवण्यात अपयश आले होते. तरीदेखील या चाहत्याचे आपल्या आवडत्या खेळाडूवरील प्रेम काही कमी झाले नाही.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, या चाहत्याने टीव्ही सुरू केला आहे आणि नाणेफेक सुरू आहे. यावेळी विराट कोहलीकडे कॅमेरा वळताच या चाहत्याने कापुर जाळले आणि आपल्या तळहातावर ठेऊन आरती सुरू केली.
https://twitter.com/TrendVirat/status/1445761752226930689?t=Gs2y6s_4j8psqFFQbvzzoA&s=19
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा ४ धावांनी पराभव
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून प्रथम फलंदाजी करताना जेसन रॉयने ४४ धावांची खेळी केली होती. तर केन विलियमसनने ३१ धावांचे योगदान दिले होते. या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबाद संघाला २० षटक अखेर ७ बाद १४१ धावा करण्यात यश आले होते. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक ४१ तर ग्लेन मॅक्सवेलने ४० धावांचे योगदान दिले. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला हे आव्हान पूर्ण करता आले नाही.
शेवटच्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला विजयासाठी १३ धावांची आवश्यकता होती. परंतु त्यांना या धावा करता आल्या नाही. शेवटी या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने ४ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई वि. हैदराबाद सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी भिडणार ४ संघ, असे पाहता येतील सामने
गोलमाल है भाई…! एकीकडे पटापट विकेट्स जात असताना राजस्थानच्या ताफ्यात सुरू होता भलताच गोंधळ