---Advertisement---

जडेजाच्या त्या शॉटवर विराटसह प्रशिक्षक आणि ड्रेसिंग रूम नाराज? माजी दिग्गजाची मोठी प्रतिक्रिया

Ravindra Jadeja
---Advertisement---

अहमदाबाद कसोटी सामन्यात भारतीय संघ सध्या 88 धावांच्या आघाडीवर आहे. अवघ्या एका दिवसाचा खेळ राहिला आहे आणि अजून 20 विकेट्सचा खेळ बाकी आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या हा चौथा कसोटी सामना निकाली निघण्याची फार कमी अपेक्षा असली, तरी उभय खेळाडूंचे त्यांच्या प्रदर्शनासाठी कौतुक होत आहे. रविंद्र जडेजा तिसऱ्या दिवशी संयमी खेळी करताना दिसला, पण चौथ्या दिवशी सुरुवातीच्या षटकांमध्येच त्याने विकेट गमावली. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे माजी दिग्गज सुनील गावसकर यांनी जडेजाला चांगलेच सुनावले.

बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील (BGT) हा चौथा आणि शेवटचा सामना असून विजय भारतीय संघासाठी खूपच महत्वाचा आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी सुरुवातीलच रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने विकेट युवा टॉड मर्फी याच्या चेंडूवर विकेट गमावली. मर्फी त्याच्या रणनीतीने गोलंदाजी करत होता. डावातील आठव्या षटकात जडेजा मर्फीच्या एका चेंडूवर विकेट गमावता गमावता राहिला. पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने त्याने मिड-ऑनच्या दिशेने एक चुकीचा शॉट खेळला आणि उस्मान ख्वाजाच्या हातात झेलबाद झाला. जडेजा ज्या पद्धतीने बाद झाला, ते पाहून सुनील गावसकर (Sunil Gavaskar) चांगलेच संतापले.

जडेजा चुकिचा शॉट खेळून बाद झाल्यानंतर गावसकर म्हणाले की, “असा शॉट खेळण्याची गरज काय होती? विराट कोहलीला हा शॉट आवडला नाहीये. ड्रेसिंग रूनदेखील खुश नाहीये. मी सांगतो की, प्रशिक्षक राहुल द्रविड यांनादेखील हा शॉट आवडला नाही. जडेजाने खूप जबाबदारीने ही खेळी केली, मग असा शॉट खेळणे म्हणणे मला समजत नाहीये. हे माझ्या विचारक्षमतेच्या बाहेर आहे.”

दरम्यान, उभय संघांतील या सामन्यांचा एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 480 धावा साकारल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात 571 धावा केल्या. भारतासाठी विराट कोहली याने 186, तर शुबमन गिल याने 128 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियासाठी उस्मान ख्वाजा याने 180, तर कॅमरून ग्रीन याने 114 धावांची खेळी केली. गोलंदाजी विभागात रविचंद्रन अश्विन सर्वोत्तम ठरला. अश्विनने पहिल्या डावात टाकलेल्या 47.2 षटकात 91 धावा दिल्या आणि सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने नाबाद 3 धावा केल्या.
(Sunil Gavaskar feels that the coach and the dressing room along with Virat Kohli are upset over Ravindra Jadeja’s wrong shot)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आजारी असतानाही खेळला विराट कोहली? अनुष्काच्या स्टोरीमुळे उंचावली चाहत्यांच्या मनातील प्रतिमा
टीम इंडियासह केकेआरचे वाढले टेन्शन! श्रेयसची दुखापत गंभीर? इतक्या दिवसांसाठी होऊ शकतो बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---