क्रिकेटच्या खेळात खेळाडूचा फिटनेस हा महत्त्वाची भूमिका बजावतो आणि जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला जातो तेव्हा त्याचे महत्त्व आणखी वाढते. अनेक खेळाडूंची अफाट प्रतिभा फिटनेसमुळे वाया जाते. पण असे काही निवडक खेळाडू आहेत, जे शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसतानाही या खेळात आपली क्षमता सिद्ध करत आहेत. सरफराज खान (Sarfaraz Khan), रिषभ पंत (Rishabh Pant) हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण ठरले. तत्पूर्वी यावर दिग्गज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी दोन्ही खेळाडूंचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले.
गावसकर यांनी सोमवारी (21 ऑक्टोबर) रोजी स्पोर्टस्टारच्या स्तंभात लिहिले, “हे घडले कारण निर्णय घेण्याच्या पदांवर असलेल्या लोकांचा असा विश्वास होता की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी त्यांना आवश्यक वाटणारा फिटनेस नाही. बॅटने मैदानावर सरफराजची कामगिरी त्याच्या फिटनेसपेक्षाही प्रभावी होती. दुर्दैवाने, भारतीय क्रिकेटमध्ये असे अनेक निवडकर्ते आहेत, ज्यांचे विचार आकलनाच्या पलीकडचे आहेत.”
पुढे बोलताना सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की “रिषभ पंत हा आणखी एक खेळाडू आहे ज्याचा फिटनेस निवडकर्त्यांना पाहिजे. पण तो प्रभावी खेळाडू आहे. आपण हे विसरू नये की तो दिवसभर विकेटकिपींग करतो. ज्यासाठी केवळ 6 तास उठणे-बसणे गरजेचे नाही, तर थ्रो पकडण्यासाठी स्टंपकडे धावणे देखील गरजेचे आहे. म्हणून कृपया यो-यो चाचण्यांकडे दुर्लक्ष करा आणि एक खेळाडू किती मानसिकदृष्ट्या मजबूत आहे ते पहा. हे खेळाडूच्या फिटनेसचे खरे सूचक असेल. जर एखादा खेळाडू संपूर्ण दिवस फलंदाजी करू शकतो किंवा दिवसात 20 षटके टाकू शकतो तर तो सामन्यासाठी योग्य आहे, मग त्याचा फिटनेस कितीही चांगला असो वा नसो.”
न्यूझीलंडविरूद्धच्या भारताच्या पराभवानंतर गावसकर यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “भारताचे शौर्य व्यर्थ गेले, कारण सरफराजच्या पाठोपाठ आलेल्या फलंदाजांकडे कमी उसळीच्या खेळपट्टीला सामोरे जाण्याची शैली नव्हती. पण भारताचा बेंगळुरूमधील हा पराभव पाहून ऑस्ट्रेलियात काय होणार याची काळजी वाटते.”
हेही वाचा-
‘जस्प्रीत बुमराहपेक्षा नसीम शाह चांगला गोलंदाज’, पाकिस्तानी स्टारचा चकित करणारा दावा
सर्वाधिक वेळा महिला टी20 विश्वचषक जिंकणारे संघ
दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ दिग्गजाचे 5 खतरनाक रेकाॅर्ड, कोणत्याही फलंदाजासाठी मोडीत काढणे अशक्य!