सध्या भारतीय संघ न्यूझीलंडविरूद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. दरम्यान भारताचा युवा प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या वादात सापडला आहे. शाॅ भारतीय संघाच्या बाहेर होऊन बराच काळ झाला आहे. आता त्याला मुंबईच्या रणजी संघाकडूनही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. फिटनेसच्या समस्येमुळे शाॅ ला मुंबईच्या निवड समितीने संघातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
मुंबईच्या निवड समितीने ‘पृथ्वी शॉ’सोबत (Prithvi Shaw) स्वीकारलेल्या वृत्तीनंतर या युवा खेळाडूला भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकरांची (Sunil Gavaskar) साथ मिळाली आहे. गावसकरांनी पृथ्वी शाॅच्या फिटनेसशी संबंधित रिपोर्टवर जोरदार टीका केली असून खेळाडूचे समर्थन केले आहे.
भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “त्याला रणजी संघातून वगळण्यात आल्याबद्दल संमिश्र बातम्या येत आहेत. जर ते त्याच्या वृत्ती, दृष्टिकोन आणि शिस्तीबद्दल असेल तर ते समजण्यासारखे आहे, परंतु आशा आहे की त्याचा त्याच्या वजनाशी काहीही संबंध नाही.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “एका रिपोर्टमध्ये असे सुचवले आहे की, त्याच्या शरीरात 35 टक्के जास्त चरबी आहे. आम्ही बेंगळुरू कसोटीतही असेच पाहिले आहे, सरफराज खान नावाचा दुसरा खेळाडू, ज्याच्या वजनाची आणि शरीराची सामान्यांमध्ये खूप चर्चा झाली आहे. त्याने 150 धावांची शानदार खेळी खेळली आणि त्याने दाखवून दिले आहे की, हे तुमच्या शरीराच्या आकाराचे आणि कंबरेच्या आकाराचे नाही तर ते क्रिकेटच्या तंदुरुस्तीबद्दल आहे.”
गावसकर म्हणाले की, “हे असे आहे की एकतर तुम्ही 150 धावा करा किंवा तुम्ही दिवसभर फलंदाजी करू शकता आणि दिवसात 20 षटके टाकू शकता. हे खेळाडूच्या फिटनेसचे माप असावे. असे किती खेळाडू आहेत ज्यांच्या शरीरात शून्य किंवा खूप कमी चरबी आहे आणि त्यांनी पृथ्वी शाॅ प्रमाणे 379 धावा केल्या आहेत? मी माझी फिटनेसची केस इथेच संपवतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
BGT; ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी निवडकर्त्याला झाली कोहली-पुजाराच्या जोडीची आठवण! म्हणाला…
आरसीबीच्या ‘या’ स्टार खेळाडूने रणजी ट्राॅफीत 68 चेंडूत झळकावले शानदार शतक!
IND vs NZ; तिसऱ्या सामन्यासाठी ‘या’ स्टार खेळाडूची भारतीय संघात एँट्री!