सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी एकूण 15 विकेट्स पडल्या. दरम्यान भारताचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी तेथील खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतीय खेळपट्ट्यांवर टीका करणाऱ्यांना त्यांनी जोरदार खडसावले आहे.
एबीसी स्पोर्टशी बोलताना माजी भारतीय दिग्गज खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) म्हणाले की, “माजी ऑस्ट्रेलियन आणि इंग्लिश क्रिकेटपटू नेहमीच भारतीय खेळपट्ट्यांबद्दल आणि तेथील परिस्थितीबद्दल बोलतात. आम्ही रडणारे नाही. आम्ही तक्रार करणारे नाही. तुम्ही आम्हाला तक्रार करताना कधी पाहणार देखील नाही. पण भारताच्या एका दिवसात 15 विकेट्स गेल्या असत्या तर परिस्थिती नरकासारखी झाली असती.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, “ग्लेन मॅकग्रा म्हणाला की त्याने इतके गवत यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. तुम्ही कोणत्याही माजी भारतीय क्रिकेटपटूला खेळपट्टीबद्दल तक्रार करताना ऐकले आहे का?” आम्ही बाहेर जाऊन क्रिकेट खेळतो, म्हणून आम्ही कठोर परिश्रम घेतो. विदेशात देशांतर्गत संघांना पराभूत करणे खूप कठीण आहे. मी म्हणालो होतो जेव्हा आपण काल खेळपट्टी पाहिली तेव्हा तिथे गाय चरू शकली असती. ही कसोटी सामन्यासाठी आदर्श खेळपट्टी नाही. कारण आपल्याला वाटते की सामना चौथ्या आणि पाचव्या दिवसांपर्यंत चालेल.”
सध्या सुरू असलेल्या बाॅर्डर-गावसकर मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ आघाडीवर, तर भारतीय संघ पिछाडीवर आहे. ही मालिका 2-1 अशी आहे. यातील एक सामना ड्राॅ झाला असून एक सामना भारताने जिंकला आहे, तर 2 सामन्यात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले आहे. भारताला ही मालिका गमवायची नसेल, तर त्यांना सिडनी कसोटी सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रिषभ पंतच्या विस्फोटक खेळीने हैराण… पाहा काय म्हणाले कांगारू प्रशिक्षक
धनश्रीसोबत घटस्फोट झाला, तर चहलला किती प्रॉपर्टी द्यावी लागेल?
सिडनी कसोटीत किती धावा डिफेंड करू शकते टीम इंडिया? तिसऱ्याच दिवशी मिळणार सामन्याचा निकाल?