चेन्नई सुपर किंग्सने (सीएसके) शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव करत चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद आपल्या नावे केले. यापूर्वी चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. या विजयानंतर अनेक आजी-माजी क्रिकेटपटू चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि त्याच्या संघाचे कौतुक करत आहे. आता यामध्ये भारताचे सर्वकालीन महान सलामीवीर व आयपीएलमध्ये समालोचकाची भूमिका बजावणारे सुनील गावसकर यांचा समावेश झाला आहे.
काय म्हणाले गावसकर
आयपीएल २०२१ च्या अंतिम सामन्यानंतर प्रसारण वाहिनीशी बोलताना गावसकर म्हणाले, “धोनी खूप प्रभावशाली आहे. त्याचा आपल्या खेळाडूंवर भरपूर विश्वास असून तो प्रत्येकाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. क्रिकेटमध्ये प्रत्येक दिवशी तुमच्यासोबत न्याय होईल असं नाहीच. मात्र, धोनी या खराब दिवशीही खेळाडूला संधी देतो.”
गावसकर पुढे बोलताना म्हणाले, “मी तितका भाग्यशाली नाही की, मी धोनी असलेला ड्रेसिंग रूमचा भाग होऊ शकलो नाही. दबावाच्या स्थितीतही तो मला कमालीचा शांत दिसतो. मात्र, अंतिम सामन्यात शार्दुल ठाकूर १९ वे षटक टाकत असताना तो काहीसा रागवला होता. परंतु, सामना उगीचच लांबत चालल्यामुळे तो चिडला असावा.”
चेन्नईचे चौथे विजेतेपद
दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून केकेआरने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. चेन्नईने पहिल्यांदा फलंदाजी करताना फाफ डू प्लेसिसचे अर्धशतक व इतर फलंदाजांच्या योगदानामुळे निर्धारित २० षटकात ३ गडी गमावून १९२ धावा केल्या होत्या.
सीएसकेने दिलेल्या १९३ धावांचे आव्हान पूर्ण करण्यात केकेआर संघ अपयशी ठरला. त्यांनी निर्धारित २० षटकात ९ गडी गमावत केवळ १६५ धावा केल्या. सीएसकेसाठी शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर, केकेआरसाठी व्यंकटेश अय्यर व शुबमन गिल या सलामीवीरांनी अर्धशतके साजरी केली. मधल्या फळीतील फलंदाज पुन्हा एकदा अपयशी ठरल्याने केकेआरला आपले तिसरे विजेतेपद पटकावण्यात अपयश आले.
महत्त्वाच्या बातम्या –
लहान मुलाचा डान्स पाहून विराट कोहली थक्क, व्हिडिओ लिंक शेअर करत लिहिला भावुक संदेश
Video: आयपीएल ट्रॉफी घेऊन ऋतुराजची हॉटेलमध्ये दिमाखात एन्ट्री, सीएसकेने केला विजयी जल्लोष
चेन्नईला विजेतेपद जिंकून देणारे प्रशिक्षक आता टी२० विश्वचषकात बनवणार धोनीला हरवण्याचा प्लॅन