---Advertisement---

‘लिटील मास्टर’ गावस्करांना अनोखा मान, वानखेडेवर उभारला जाणार पुतळा

On: शुक्रवार, ऑगस्ट 1, 2025 12:40 PM
Sunil Gavaskar
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज सुनील गावस्कर आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांचा पुतळा वानखेडे स्टेडियमवरील मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) नव्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात येणार असल्याची घोषणा गुरुवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनने केली आहे.

‘एमसीए शरद पवार क्रिकेट म्युझियम’चे उद्घाटन ऑगस्टच्या दुसऱ्या टप्प्यात होणार असून हे संग्रहालय मुंबईच्या समृद्ध क्रिकेट वारशाला आणि त्याला घडवणाऱ्या दिग्गजांना अभिवादन ठरेल.

एमसीएने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर अभ्यागतांचे स्वागत शरद पवार आणि क्रिकेटचे दिग्गज सुनील गावस्कर यांच्या जीवन-आकाराच्या पुतळ्यांनी केले जाईल. गावस्करांचा पुतळा हा विशेषतः उत्कृष्टतेचे आणि समर्पणाचे प्रतीक ठरेल, जे पिढ्यान्पिढ्या युवा क्रिकेटपटूंना प्रेरणा देईल.”

या सन्मानाबद्दल सुनील गावस्कर भावूक झाले. ते म्हणाले, ‘माझ्या आईसमान असलेल्या मुंबई क्रिकेट असोसिएशनने माझा पुतळा उभारण्याचा निर्णय घेतला, यामुळे मी अतिशय भावुक आणि कृतज्ञ झालो आहे. एमसीएने मला क्रिकेटमधील पहिली पावले टाकताना आधार दिला आणि बीसीसीआयने माझे स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. हा सन्मान माझ्या आयुष्यभर सोबत राहील.’

शरद पवार यांनी बीसीसीआय अध्यक्षपदासोबतच एमसीए आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) अध्यक्षपदही भूषवले आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) अध्यक्ष आहेत.

या संग्रहालयात मुंबईतील क्रिकेटपटूंनी दिलेल्या दुर्मिळ आणि ऐतिहासिक आठवणींचा संग्रह असेल. तसेच ऑडिओ-व्हिज्युअल तंत्रज्ञानाद्वारे मुंबई क्रिकेटच्या प्रवासातील महत्त्वाच्या टप्प्यांचा अनुभव घेता येईल.

या दरम्यान एमसीए अध्यक्ष अजिंक्य नाईक म्हणाले, “एमसीए शरद पवार क्रिकेट म्युझियम हे मुंबई क्रिकेटमधील दिग्गजांना दिलेला आमचा मनःपूर्वक अभिवादन आहे. हे संग्रहालय मुंबई क्रिकेटच्या समृद्ध इतिहासाचे आणि पवार यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचे जिवंत प्रतीक ठरेल.”

“सुनील गावसकरांचा पुतळा हा उत्कृष्टता आणि चिकाटीचे सामर्थ्यशाली प्रतीक ठरेल. त्यांच्या योगदानामुळे अनेक युवा क्रिकेटपटूंना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल,” असेही त्यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---