---Advertisement---

चालू सामन्यात चक्क अंपायरने कापले ‘लिटल मास्टर’ गावसकरांचे केस, वाचा तो किस्सा

On: रविवार, जुलै 10, 2022 11:30 AM
---Advertisement---

भारताचे माजी कर्णधार सुनिल गावसकर हे मंगळवारी, 10 जुलैला त्यांचा 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. गावसकर त्याच्या निडर फलंदाजीसाठी ओळखले जातात.

कसोटीत 10,000 धावा करणारे पहिलेच क्रिकेटपटू ठरलेल्या गावसकरांच्या बाबतीत एकदा एक विचित्र किस्सा घडला होता. त्यांचे केस एकदा चक्क चालू सामन्यात मैदानावरील पंचांनीच कापले होते.

झाले असे की 1974 मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे चालू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात गावसकर फलंदाजी करत होते. त्यावेळी त्यांचे केस सारखे डोळ्यात जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

तेव्हा त्यांनी मैदानावरील पंच डिकी बर्ड यांना त्यांचे केस केपण्याची विनंती केली. यासाठी बर्ड यांनी तयारी दाखवली. त्यांनी त्यांच्याकडे चेंडूच्या शिवणीचे धागे कापण्यासाठी असणाऱ्या कात्रीने गावसकरांचे केस कापले होते.

हा सामना पुढे भारतीय संघ 113 धावांनी पराभूत झाला होता. परंतू गावसकर पहिल्या डावात 101 धावांवर नाबाद राहिले होते तर दुसऱ्या डावात 58 धावांवर बाद झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ कारणामुळे सुनील गावसकर घालत नसत हेल्मेट, स्वतःच केला होता खुलासा

सचिन म्हणतो; त्यांना वयाच्या १३व्या वर्षी पाहिले, तेव्हा विश्वास बसत नव्हता!

बॅटिंगमध्ये फ्लॉप ठरेलल्या विराटने क्षेत्ररक्षण करताना लुटली मैफील, पाहा भन्नाट व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment