भारताने न्यूझीलंड दौऱ्यात उत्तम कामगिरी करत 5 सामन्यांची वन-डे मालिका 4-1ने जिंकली आहे. या मालिकेत केएल राहुलला संधी देण्यात आली नव्हती. तसेच तो इंग्लंड लायन्स विरुद्धही अपयशी ठरला आहे. यामुळे त्याचे आयसीसी विश्वचषक 2019मधील स्थान धोक्यात आले आहे.
युवा खेळाडू शुबमन गिललाही न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या दोन वन-डे सामन्यात संघात स्थान दिले होते. परंतु त्यालाही चमकदार कामगिरी करता आली नाही.
मात्र या दोघांना सोडून भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकला विश्वचषकात राखीव सलामीवीर म्हणून संघात जागा देण्यात यावी असे सुचविले आहे.
यावेळी त्यांनी रिषभ पंतही संघात असला तर भारताकडे कार्तिक, एमएस धोनी मिळून यष्टीरक्षणासाठी तीन पर्याय असतील असेही म्हटले आहे.
कार्तिकने मागील काही सामन्यात मधल्या फळीत फलंदाजीला येत चांगली कामगिरी केली आहे. त्याचबरोबर त्याने फिनिशर म्हणूनही उत्तम भुमिका पार पाडली आहे.
गावसकर यांचा सल्ला जरी आश्चर्यकारक असला तरी कार्तिक एक असा खेळाडू आहे जो संघासाठी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असतो.
अंबाती रायडूनेही न्यूझीलंड विरुद्धच्या शेवटच्या सामन्यात 90 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली होती. यामुळे त्याचे विश्वचषकातील स्थान जवळ-जवळ निश्चितच झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–बापरे! या फलंदाजाने एकाच सामन्यात केली दोन द्विशतके…
–कोहलीचा तिसरा क्रमांक धोक्यात, यापूढे त्याजागेवर खेळणार हा खेळाडू
–टीम इंडिया विरुद्धच्या टी२० मालिकेला न्यूझीलंडचा हा स्पोटक खेळाडू मुकणार, जाणून घ्या कारण