T20 World Cup 2024: 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषक 2024 स्पर्धेला अजून काही महिने बाकी आहेत, परंतु कार्यक्रम जाहीर झाल्यापासून सातत्याने चर्चा होत आहे. दरम्यान, आगामी आयसीसी स्पर्धेसाठी सुनील गावसकर यांनी केएल राहुल याला यष्टिरक्षक फलंदाजाच्या भूमिकेसाठी एक उत्तम पर्याय म्हणून सांगितले, परंतु त्यांचा असा विश्वास आहे की, जर रिषभ पंत पूर्णपणे तंदुरुस्त असेल तर त्याने स्वतः ही भूमिका निभावली पाहिजे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडलेल्या संघात जितेश शर्मा (Jitesh Sharma) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) यांची यष्टिरक्षक फलंदाज म्हणून निवड समितीने निवड केली आहे. इशान किशन (Ishan Kishan) विश्रांती देण्यात आली आहे, रिषभ पंत (Rishabh Pant) अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, तर केएल राहुल (Kl Rahul) याला या मालिकेतून वगळण्यात आले आहे. (sunil gavaskar on kl rahul place in india 2024 t20 world cup squad)
स्टार स्पोर्ट्स शो बोलताना गावसकर यांना 2024 टी20 विश्वचषकात केएल राहुल मधल्या फळीतील यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका करताना दिसत आहे का, असे विचारण्यात आले. त्याला उत्तर देताना ते म्हणाले, “मी त्याला यष्टिरक्षक म्हणूनही पाहतो, पण त्याआधी मी एक गोष्ट सांगेन, जर रिषभ पंत एका पायावरही तंदुरुस्त असेल तर त्याने संघात यावे कारण तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये गेम चेंजर आहे. जर मी निवडकर्ता असेल तर मी त्याचे नाव प्रथम घेईन. परंतु, रिषभ पंत अनुपलब्ध असल्यास आणि केएल राहुलने यष्टीरक्षण केल्यास ते चांगले होईल, कारण संतुलन देखील तयार होईल. त्यानंतर तुमच्याकडे त्याला सलामीवीर म्हणून खेळवण्याचा किंवा मधल्या फळीत त्याचा वापर फिनिशर म्हणून करण्याचा पर्याय असेल.” (Rahul or Pant? Gavaskar picks his preferred wicketkeeper for T20 World Cup 2024)
हेही वाचा
YSRCP सोडल्यानंतर रायुडू करणार JSPमध्ये प्रवेश?, पवन कल्याणसोबतचे फोटो शेअर करत दिले संके
Virat Kohli । अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यातून विराटची माघार, ऐन वेळी द्रविडने दिली माहिती