भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज गेल्या काही काळापासून त्याच्या खराब कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर मालिकेत त्यानं सात डावांत फक्त 14 बळी घेतले. याशिवाय तो गरजेच्या वेळी विरोधी फलंदाजांवर दबाव आणण्यात देखील अपयशी ठरला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहवरचा दबाव अधिक वाढतोय. भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर सिराजच्या या कामगिरीमुळे निराश झाले आहेत. टीम मॅनेजमेंटनं त्याला सांगावं की जर त्यानं चांगली कामगिरी केली नाही तर त्याला संघातून काढण्यात येईल, असं मत गावस्कर यांनी मांडलं.
या मालिकेत ऑस्ट्रेलियन फलंदाज बहुतेक वेळा सिराजविरुद्ध सहज धावा काढत आहेत. तो नवीन चेंडूने देखील काही चमत्कार करू शकला नाही. सिराजला त्याच्या गेल्या दौऱ्यातील कामगिरीची पुनरावृत्ती करता आलेली नाही. या दौऱ्यात तो सतत संघर्ष करताना दिसत आहे. मात्र, संघ व्यवस्थापनानं त्याच्यावर विश्वास व्यक्त करत त्याला सलग चौथ्या सामन्यात खेळण्याची संधी दिली.
सुनील गावस्कर ‘स्टार स्पोर्ट्स’शी बोलताना म्हणाले, “मला वाटतं की सिराजला कदाचित विश्रांतीची गरज आहे. त्याला ब्रेक द्या असं मी म्हणत नाही. त्याला तु चांगली कामगिरी केली नाही तर तुला संघातून वगळण्यात येईल, असं सांगावं लागेल. सिराजला, “तुझा परफॉर्मन्स चांगला नव्हता आणि म्हणूनच तुला काढून टाकलं जात आहे”, असं थेट सांगावं लागेल, असं परखड मत गावस्कर यांनी मांडलं.
सुनील गावस्कर पुढे बोलताना म्हणाले, “विश्रांतीबद्दल बोलायचं झालं तर खेळाडूंची विचारसरणी वेगळी असते. त्यांना वाटतं की त्यांना खेळ सुधारण्याची गरज नाही. जर तुम्हाला संघात दोन बदल करायचे असतील, तर प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांना बुमराहसोबत संधी द्यायला हवी.”
हेही वाचा –
भारतावर फॉलोऑनचे संकट, अर्धा संघ तंबूत परत, बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाचा वरचढ
बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी विराटची छेड काढली, संतापलेल्या कोहलीचा व्हिडिओ व्हायरल
यशस्वीचे शतक हुकले, तरीही केला खास विक्रम, सचिन तेंडुलकरला टाकले मागे