टी२० विश्वचषक २०२२ सुरू होण्यासाठी अवघे काही महिनेच उरले आहेत. ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघ आतापासूनच तयारीला लागले आहेत. भारतीय क्रिकेट संघही टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने तयारी करतो आहे. मायदेशातील दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी२० मालिका संपल्यानंतर आता भारतीय संघ २ सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी आयर्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी भारताचा अनुभवी सलामीवीर शिखर धवन याला निवडले गेले नाही. यानंतर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी धवनबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
गावसकरांना (Sunil Gavaskar) वाटते की, धवन (Shikhar Dhawan) आता भारतीय संघ (Team India) व्यवस्थापनाच्या रणनितीत फिट बसत नाही. याचमुळे त्याला आगामी आयर्लंड दौऱ्यासाठी (India Tour Of Ireland) डावलले गेले आहे.
भारतीय संघ निवडकर्ते जरी धवनवर दुर्लक्ष करत असले तरीही, ३६ वर्षीय धवनच्या फलंदाजीची धार अजूनही कमी झालेली नाही. त्याने आयपीएलच्या पंधराव्या हंगामात धडाकेबाज प्रदर्शन केले होते. त्याने या हंगामात पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्त्व करताना १४ सामन्यात ३८.३३ च्या सरासरीने ४६० धावा फटकावल्या होत्या. तसेच तो २०१६ पासून सातत्याने आयपीएलमध्ये ४०० पेक्षा जास्त धावा करत आहे. यानंतरही धवनला आयर्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी डावलले गेल्याने टी२० विश्वचषकासाठी त्याची निवड होणे कठीण दिसते आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजी नव्हे तर स्लिपमध्ये झेल पकडण्याचा सराव करतोय पुजारा, अजिंक्य रहाणे आहे कारण
‘भुवीच्या गोलंदाजीमुळेच आमच्या संघावर दबाव वाढला’, आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूची कबूली