मागच्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रिकेट संघात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. विराट कोहलीकडून हे एकदिवसीय कर्णधारपद बीसीसीआयने काढून घेतल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर रोहित आणि विराटमध्ये सध्या वाद सुरु असल्याच्या अफवा देखील ऐकायला मिळल्या. आता भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी यासंदर्भात त्यांचे मत मांडले आहे
गावसकरांनी रोहित आणि विराटच्या मुद्द्यावर त्यांचे मत स्पष्टपणे व्यक्त केले. त्यांच्या मते जोपर्यंत हे दोन खेळाडू यासंदर्भात स्वतः काही बोलत नाहीत, तोपर्यंत लोकांनीही कही निष्कर्ष काढू नयेत. गावसकर असे देखील म्हणाले की, “या दोघांनी देशासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे आणि कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय त्यांच्या विषयी चर्चा करणे योग्य नाहीये.”
गावसकर एका मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “प्रश्न असा आहे की, खरच असे काही चालू आहे ? जोपर्यंत दोन्ही खेळाडू समोर येऊन काही बोलत नाहीत. तोपर्यंत आपण देखील यासंदर्भात बोलले नाही पाहिजे. होय, अजहरुद्दीन काहीतरी म्हटला आहे, पण जर त्याच्याकडे काही आतमधील बातमी असेल, काय झाले आहे, तर त्याने पुढे येऊन सांगितले पाहिजे की, काय झाले आहे. या दोन्ही खेळाडूंनी देशासाठी नेहमीच अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे आपण कोणावरही बोट दाखवू शकत नाही.”
दरम्यान, मागच्या महिन्यात पार पडलेल्या टी२० विश्वचषकानंतर विराट कोहलीने आधी जाहीर केल्याप्रमाणे टी२० संघाचे कर्णधारपद स्वतःच्या इच्छेने सोडले होते. बीसीसीआयने ८ डिसेंबरला दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. त्याचवेळी विराटची इच्छा नसताना देखील त्याला एकदिवसीय संघाच्या कर्णधापदावरून हटवले गेले आणि रोहित शर्मावर ही जबाबदारी सोपवण्यात आली. बीसीसीआयच्या या निर्णयानंतर चाहत्यांमध्ये आणि माध्यमांमध्ये या दोघांविषयची चर्चांना उधाण आले आहे. सध्या भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे आणि कसोटी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी विराट कोहलीकडे आहे.
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकात पुन्हा भिडणार भारत-पाकिस्तान! तारीख झाली फिक्स
स्वतः क्रीडामंत्र्यांनी केली बीसीसीआयची कानउघडणी; म्हणाले…
‘मी मागच्या अडीच वर्षांपासून हेच सांगत आलोय’, रोहित विषयीच्या प्रश्नावर अखेर विराटचे स्पष्टीकरण