---Advertisement---

‘मी मागच्या अडीच वर्षांपासून हेच सांगत आलोय’, रोहित विषयीच्या प्रश्नावर अखेर विराटचे स्पष्टीकरण

On: बुधवार, डिसेंबर 15, 2021 4:32 PM
rohit-virat-odi
---Advertisement---

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात २६ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात येईल. या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी गुरुवारी (१६ डिसेंबर) भारतीय संघ रवाना होणार आहे. त्यापूर्वी बुधवारी (१५ डिसेंबर) विराट कोहलीने पत्रकार परिषदेत संवाद साधला. यावेळी त्याने अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली असून त्याने रोहित शर्माबरोबरच्या संबंधाबद्दलही (Virat Kohli and Rohit Sharma Relation) भाष्य केले आहे.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्त्वगटात काही बदल केले. त्यानुसार विराट कोहलीला कसोटी कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे, तर अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. तसेच वनडे कर्णधारपदावरुन विराट कोहलीला हटवून रोहित शर्माकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, विराट कोहलीने काही दिवसांपूर्वीच टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यामुळे टी२० संघाचे कर्णधारपदही सध्या रोहितकडे आहे, तर विराट केवळ कसोटी संघाचा कर्णधार आहे.

भारतीय संघाच्या या नेतृत्त्वबदलाची चर्चा क्रिकेट जगतात मोठ्या प्रमाणात झाली. त्यातच दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी मालिकेतून रोहित शर्माने दुखापतीमुळे माघार घेतली. तसेच विराट या दौऱ्यातील वनडे मालिका खेळणार नसल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे रोहित आणि विराट या दोघांमध्ये वाद असल्याची शक्यता वर्तवली जात होती. आता याबद्दल स्वत: विराटनेच भाष्य केलंय.

रोहितबरोबर कोणतेही वाद नाही – विराट
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्माबरोबर कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच त्याने रोहितच्या कर्णधारपदाबद्दलही आपली मतं व्यक्त केली आहेत.

विराट म्हणाला, ‘रोहित हा एक सक्षम कर्णधार आहे आणि आपण ते आयपीएलमध्ये, तसेच त्याने भारतासाठी नेतृत्त्व करताना पाहिले आहे. राहुल द्रविडची भूमीकाही खूप महत्त्वाची आहे. त्या दोघांनाही माझा पूर्ण पाठिंबा असेल. माझ्यात आणि रोहितमध्ये कोणतेही वाद नाही. मी मागील अडीच वर्षापासून या गोष्टीचे स्पष्टीकरन देत आहे. मी आता हे सांगून थकलो आहे.’

विराट खेळणार पूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा 
विराटने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेत न खेळण्याच्या चर्चेलाही पूर्णविराम लावला आहे. त्याने स्पष्ट केले आहे की, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. त्यामुळे विराट संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौऱ्यात खेळताना दिसणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

एक कॉल आला अन् दीडतासात विराटच्या कॅप्टन्सीचा गेम खल्लास

विराट खेळणार संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा, पण वनडे कॅप्टन्सीबद्दल केले धक्कादायक खुलासे

अरर! दुसऱ्या ऍशेस कसोटीपूर्वी कर्णधार रुटला स्टोक्सनेच केले असते दुखापतग्रस्त, पाहा नक्की काय झाले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---