---Advertisement---

स्वतः क्रीडामंत्र्यांनी केली बीसीसीआयची कानउघडणी; म्हणाले…

On: बुधवार, डिसेंबर 15, 2021 4:35 PM
anurag thakur
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघात सध्या सुरु असलेला रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यातील वाद आणखी जोर पकडत आहे. यावर आता केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी (Sports Minister Anurag Thakur) कोणाचेही नाव न घेता कडक संदेश दिला आहे. बुधवारी संसदेबाहेर प्रसारमाध्यमांनी त्यांना या वादावर प्रश्न विचारला होता. त्यावर ते म्हणाले, ‘खेळापेक्षा कोणीही मोठा नाही, खेळ सर्वोच्च आहे. खेळाडूंमध्ये काय चालले आहे ते मी सांगू शकत नाही. त्यांच्याशी संबंधित असोसिएशन किंवा संस्थेची ही जबाबदारी आहे. त्यांनी याबाबत माहिती देणे योग्य ठरेल.”

भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित आणि विराटमध्ये मतभेद झाल्याच्या बातम्या येत आहेत. वनडे आणि टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या दौऱ्यातील कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. याला बीसीसीआयने दुजोरा दिला आहे. आता या दौऱ्यातील वनडे मालिकेतून कसोटी कर्णधार विराट कोहलीने माघार घेतल्याचे वृत्त आले होते. मात्र, विराटने स्वतः पत्रकार परिषदेत आपण संपूर्ण दौरा खेळणार असल्याचे स्पष्ट केले.

भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सुरू होईल. कसोटी मालिकेत विराट कोहली संघाचे नेतृत्व करणार आहे. वनडे मालिका १९ जानेवारीपासून खेळवली जाईल. दौऱ्यासाठीकसोटी संघ जाहीर झाला आहे, तर एकदिवसीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही.

दरम्यान, सोमवारी मुंबईत सराव सुरू असताना रोहितला दुखापत झाली. त्याच्या हाताला दुखापत झाली आहे. मात्र, वनडू मालिकेपर्यंत तो तंदुरुस्त राहण्याची अपेक्षा आहे. रोहितच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडण्याची घोषणा करत बीसीसीआयने त्याच्या जागी गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालचा समावेश केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

एक कॉल आला अन् दीडतासात विराटच्या कॅप्टन्सीचा गेम खल्लास

विराट खेळणार संपूर्ण दक्षिण आफ्रिका दौरा, पण वनडे कॅप्टन्सीबद्दल केले धक्कादायक खुलासे

विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून माघार घेणार की नाही? बीसीसीआय अधिकाऱ्याचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---