भारतीय संघाचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर यांनी अहमदाबाद कसोटी सामना सुरू असताना भारतीय गोलंदाजांची चूक दाखवून दिली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुरुवारी (9 मार्च) रोजी हा मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना सुरू झाला. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत संघाला चांगली सुरुवात मिळवून दिली. सुनील गावसकर यांच्या मते भारतीय गोलंदाजांनी पहिल्या दिवसाच्या शेवटच्या तासांमध्ये अपेक्षित कामगिरी केली नाही.
ऑस्ट्रेलियान संघाने अहमदाबाद कसोटीच्या (Ahmedabad Test) पहिल्या दिवशी 170 धावांवर चार विकेट्स गमावल्या होत्या. भारतीय संघाला चौथी विकेट मिळाल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नवीन चेंडू घेतला. भारतीय गोलंदाजांना अधिक आक्रमकतेने गोलंदाजी करतील या हेतूने रोहितने हा निर्णय घेतला, पण गोलंदाज कर्णधाराच्या अपेक्षांवर खरे उतरले नाहीत. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना कॅमरून ग्रीन आणि उस्मान ख्वाजा यांच्यात 85 धावांची नाबाद भागीदारी झाली होती. पहिल्या दिवशी शेवटच्या एक तासात भारतीय गोलंदाजांच्या प्रदर्शनावर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) नाराज दिसत आहेत. याविषयी त्यांनी आपली खास प्रतिक्रियाही दिली.
नवीन चेंडूवरही ऑस्ट्रेलियन फलंदाजांची फटकेबाजी – गावसकर
स्पोर्ट्स स्टारवर बोलताना गावसकर म्हणाले की, “यावर चर्चा झाली पाहिजे. भारतीय संघ नवीन चेंडू घेतल्यानंतर शेवटच्या एका तासातील प्रदर्शनावर नाराज असेल. या एका तासात ज्या पद्धतीने धावा खर्च केल्या गेल्या, चौकार गेले, हे पाहून असे वाटले की, ऑस्ट्रेलियन फलंदाज पूर्णपणे मोकळेपणाने खेळत होते.”
भारतीय गोलंदाजांचे प्रयत्न कमी पडले
गावसकर पुढे म्हणाले, “नवीन चेंडूने गोलंदाजांनी ज्या पद्धतीची गोलंदाजी केली, तसे प्रदर्शन पाहायला आपल्याला आवडत नाही. याठिकाणी अजून चांगला प्रयत्न करता आला असता. उष्णता जास्त होती, हे मलाही माहिती आहे आणि वेगवान गोलंदाजांसाठी दिवसभर गोलंदाजी करणे सोपे नसते. पण तरीही, तुम्हाला नवीन चेंडू मिळाला होता आणि तुम्ही भारतीय संघासाठी खेळत आहात. नक्कीच प्रयत्न अजून थोडे अधिक करता आले असते, असे मला वाटते.”
(Sunil Gavaskar pointed out the mistake made by the indian players in Ahmedabad test)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सची विजयाची हॅट्रिक! दिल्लीला एकतर्फी नमवत बनले टेबल टॉपर
पॅट कमिन्सवर कोसळला दुःखाचा डोंगर! आई मारियाचे निधन, ऑस्ट्रेलियन संघाकडून मिळाली श्रद्धांजली