भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) संघांमध्ये सध्या बॅंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये दिवस रात्र कसोटी सामना (Day Night Test) खेळला जात आहे. या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. यामुळे श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्या डावात केवळ १०९ धावा केल्या. जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) पहिल्या डावात एकूण ५ विकेट्स घेतल्या. ही मायदेशातील सामन्यांमधील बुमराहची सर्वोत्तम कामगिरी आहे. बुमराहच्या या गोलंदाजीवर भारतीय दिग्गज सुनील गावसकर यांनी मोठे व्यक्तव्य केले आहे.
भारताने दूसऱ्या कसोटीच्या दूसऱ्या दिवशी श्रीलंका संघाच्या उरलेल्या ४ खेळाडूंच्या विकेट ३५ चेंडूत घेतल्या. यांपैकी दोन विकेट बुमराहने घेतल्या आहेत. त्याने भारतासाठी २९ कसोटी सामन्यांमध्ये आठव्यांदा एका डावात ५ विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. सामन्याच्या दूसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना सुनील गावसकर यांनी यशस्वी गोलंदाज म्हणून बुमराहचे कौतुक केले आहे. ते म्हणाले की, “जरी बुमराह आपल्या क्रिकेट कारकिर्दीत काही वाईट टप्प्यांतून गेला असला तरीही विरुद्ध संघाचे गोलंदाज त्याला घाबरत राहतील.”
गावसकर म्हणाले की, “एवढी क्षमता, एवढी प्रतिभा, स्वत:वरील विश्वास, तो नेहमीच स्वत:ला कालच्यापेक्षा उत्तम बनवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच तो यशस्वी गोलंदाज बनला आहे. बुमराह प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत आहे. हो, क्रिकेट कारकिर्दीत असे घडते की एखाद्या खेळाडूवर वाईट वेळ सुद्धा येऊ शकते. परंतु तो असा गोलंदाज आहे, ज्याचा सामना विरुद्ध संघातील खेळाडू करु शकत नाहीत.”
गावसकर म्हणाले, “रात्रीच्या प्रकाशात जेव्हा १४० किमी प्रति तास वेगाने चेंडू येतो, तेव्हा फलंदाजाला त्या चेंडूला खेळण्यासाठी फटका निवडणे अवघड होते. परंतु दिवसाच्या वेळी हे एवढे कठिण असू शकत नाही. बुमराहकडे जो वेग आणि विविधता आहे, त्यामुळे फलंदाजाला खेळणे अवघड होते. त्याच्याकडे जी क्षमता आहे ज्यामुळे तो सेट फलंदाजांना सुद्धा बाद करु शकतो. नव्या चेंडूने तुम्ही फलंदाजाला बाद करावे अशी अपेक्षा केली जाते. कारण एक गोलंदाज म्हणून हीच तुमची ताकत आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
Photo | भारत आणि लंकेचे खेळाडू मैदानावर उतरताच मधमाशांनी केला ‘एअरस्ट्राईक’ आणि नंतर…
पाकिस्तानला ९ धावांनी धूळ चारत बांगलादेशने साकारला ऐतिहासिक विजय; काय आहे खास, वाचा
द्रविड, कोहलीकडून निवृत्तीचा सामना खेळत असलेल्या श्रीलंकन खेळाडूचे अभिनंदन, Video जिंकेल मन