आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी कर्णधार कोण? असा प्रश्न विचारला, तर सर्वांच्या तोंडून आपसुकच एमएस धोनी हे नाव येईल. धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आयसीसीच्या तीन ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. दुसरीकडे, आयपीएलमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाला 4 वेळा चॅम्पियन बनवले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणारा धोनी आता आयपीएल 2023 च्या महारणसंग्रामात खेळताना दिसणार आहे. त्यापूर्वी भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी धोनीचे गुणगान गायले आहेत.
सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी दोन वर्षांच्या बंदीनंतर चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाच्या आयपीएल स्पर्धेतील शानदार पुनरागमनाची आठवण काढली. तसेच, त्यांनी सीएसके (CSK) संघाच्या विजयाच्या आठवणींना उजाळा देत एमएस धोनी (MS Dhoni) याच्या नेतृत्वाची प्रशंसाही केली. त्यांनी म्हटले की, आपल्या खेळाडूंकडून सर्वोत्तम कामगिरी करून घेण्याची त्याची क्षमताच त्याला वेगळे बनवते.
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकरांनी ‘कॅप्टन कूल’ (Captain Cool) धोनीच्या आयपीएल कारकीर्दीची आठवण काढत म्हटले की, त्याने आपल्या संघातील खेळाडूंना सर्वोत्तम कामगिरी करण्यास भाग पाडले होते.
गावसकर म्हणाले की, “मला वाटते जेव्हा सीएसकेने पुनरागमन केले आणि ट्रॉफी जिंकली, तेव्हा ही शानदार गोष्ट होती. कारण, संघ दोन वर्षांनंतर एकत्र नव्हता. तसेच, ते वेगवेगळ्या फ्रँचायझींकडून खेळत होते आणि अचानक त्यांनी पुनरागमन केले. हेच तुमच्या नेतृत्वाच्या क्षमतांबद्दल सांगते.”
Next up: Whistles Paraak! 🥳#SummerIsHere @TheIndiaCements@msdhoni @DJBravo47 pic.twitter.com/Nl1oxCbAKj
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 23, 2023
आयपीएल 2023चे बिगुल
आयपीएल 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात अहमदाबाद येथे खेळला जाणार आहे. हा हंगाम धोनीचा शेवटचा हंगाम असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कदाचित संघाचा आपल्या कर्णधाराला ट्रॉफीसोबत निरोप देण्याचा इरादा असेल. सर्वाधिक आयपीएल ट्रॉफी जिंकण्याबाबत बोलायचं झालं, तर मुंबई इंडियन्स हा आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी 5 वेळा किताब जिंकला आहे. दुसरीकडे, एमएस धोनी याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे. आता यावेळी धोनीकडे मुंबईच्या विक्रमाची बरोबरी करण्याची सुवर्णसंधी आहे. (sunil gavaskar praises ms dhoni said csks 2018 triumph tells you about leadership)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चेंडू स्टंपला लागूनही कीवी फलंदाज नाबाद, खेळाडूही पाहतच राहिले; जीवदान मिळताच पठ्ठ्याने ठोकली फिफ्टी
“यंदा आयपीएलमध्ये होणार पृथ्वी शो!” नव्या हंगामाआधी पॉंटिंगने केले भाकीत