टी20 विश्वचषक 2022 ची सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया टी20 विश्वचषकाचा थरार सुरू होणार आहे. तत्पूर्वी क्रिकेट पंडित भारताच्या टी20 विश्वचषकासाठीच्या संघाचे विश्लेषण करण्याबरोबरच विजेत्या संघाबद्दल भविष्यवाणी करत आहेत. भारतीय संघ गेल्या 15 वर्षांपासून त्यांच्या दुसऱ्या विजेतेपदाच्या प्रतिक्षेत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ दुसऱ्यांदा टी20 विश्वचषक जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल. तत्पूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी भारतीय संघाबद्दल मोठी घोषणा केली आहे.
भारतीय संघाने (Team India) 2007 मध्ये पहिल्यांदा टी20 विश्वचषक (T20 World Cup 2022) जिंकला होता. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजेता बनला होता. त्यानंतर 2014 मध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत मजल मारू शकला होता. परंतु श्रीलंका संघाने भारतीय संघाला अंतिम सामन्यात पराभूत करत त्यांचे विजयाचे स्वप्न मोडले होते. यंदा भारतीय संघाला थोडी नशीबाची साथ मिळाली त्यांच्या झोळीत दुसरे विजेतेपद पडू शकते, असे भाकित गावसकरांनी (Sunil Gavaskar) केले आहे.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना गावसकर (Sunil Gavaskar Prediction) म्हणाले की, “माझ्या मते, प्रत्येक संघाप्रमाणे भारतीय संघालाही जर थोडी नशीबाची साथ मिळाली, तर ते नक्कीच ट्रॉफी घरी घेऊन जातील.”
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाद्वारे विश्वचषकासाठी संघाची निवड केली गेल्यानंतर आजी-माजी खेळाडू संघाचे विश्लेषण करत आहेत. मात्र लिटल मास्टरचे म्हणणे आहे की, “हा आपला संघ आहे आणि याचे समर्थन करायला पाहिजे. ते म्हणाले की, एकदा संघाची निवड केल्यानंतर आपल्याला त्याचे समर्थनच करावे लागेल. हा आपला भारतीय संघ आहे. आपण संघाच्या निवडीवर आणि चुकांवर प्रश्न उपस्थित नाही केले पाहिजे. कारण यामुळे खेळाडूंचे मनोबल घसरू शकते.”
टी20 चषकासाठी भारतीय संघ- विश्वरोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू – मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर.
महत्वाच्या बातम्या-
चॅम्पियन्सच चॅम्पियन्स! रोहितपासून ते विराटपर्यंत, भारताच्या टी20 विश्वचषक संघात विनर्सचाच बोलबाला
टी20 विश्वचषकासाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, आशिया चषकातील 5 खेळाडूंची हाकालपट्टी
एलिसा पेरीने तोडला विश्वविक्रम, ‘इतके’ किमी पळत येत डेविड वॉर्नरला केली बॉलिंग